ग्रामपंचायत कारभारात सरपंच पतीचा हस्तक्षेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:27 AM2017-10-04T00:27:13+5:302017-10-04T00:37:55+5:30

चिखली: तालुक्यातील धोत्रा भनगोजी ग्रामपंचायतच्या सरपंच  मीरा पोफळे यांचे पती भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे यांच्या  ग्रा.पं. कामकाजातील हस्तक्षेपावर आक्षेप घेत मनमानी कारभार  चालविला असल्याची तक्रार इतर महिला सदस्यांच्या पतीने  गटविकास अधिकार्‍यांकडे दिली आहे.

Sarpanch husband's intervention in Gram Panchayat administration! | ग्रामपंचायत कारभारात सरपंच पतीचा हस्तक्षेप!

ग्रामपंचायत कारभारात सरपंच पतीचा हस्तक्षेप!

Next
ठळक मुद्देमहिला सदस्य पतीने केली तक्रारचिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी ग्रामपंचायत

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: तालुक्यातील धोत्रा भनगोजी ग्रामपंचायतच्या सरपंच  मीरा पोफळे यांचे पती भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे यांच्या  ग्रा.पं. कामकाजातील हस्तक्षेपावर आक्षेप घेत मनमानी कारभार  चालविला असल्याची तक्रार इतर महिला सदस्यांच्या पतीने  गटविकास अधिकार्‍यांकडे दिली आहे.
धोत्रा भनगोजी सरपंच मीरा पोफळे यांचे पती सुनील पोफळे हे  भाजपाचे तालुकाध्यक्ष आहेत. दरम्यान, त्यांनी जि.प. फंडातून  आलेला निधी हा मागासवर्गीय वस्तीचा असताना अवांतर  ठिकाणी रस्ता करून त्यामध्ये अपहार केला. तसेच सदर काम  एका खासगी ठेकेदाराला देऊन स्वत:च केले असल्याचा आरोप  गुलाबसींग राजसिंग सोनारे यांनी केला आहे. पंचायत राज  व्यवस्थेत महिलांच्या अधिकारावर गदा आणून त्यांच्या कामात  ढवळाढवळ करण्यावर सरकारने बंदी घातली असताना सुनील  पोफळे हे आपल्या पत्नीचा अधिकार हिरावून घेऊन स्वत:च  मासिक मिटिंगलाही पुरुष व त्यांचे प्रतिनिधी अधिराज्य गाजवित  असून, दलित वस्तीसाठी रस्ता असताना ग्रा.पं. सदस्यांना न  सांगता त्यांनी सदरचा रस्त्याचे काम दुसर्‍याच ठिकाणी केले व  मर्जीतील ठेकेदाराला हाताशी धरून अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता  बनविला असल्याची तक्रार गुलाबसिंग सोनारे यांनी केली  असून, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी  केली आहे.

Web Title: Sarpanch husband's intervention in Gram Panchayat administration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.