अखेर डोणगावच्या सरपंच पायउतार; अविश्वास पारीत

By संदीप वानखेडे | Published: July 8, 2024 05:46 PM2024-07-08T17:46:25+5:302024-07-08T17:46:48+5:30

१३ सदस्यांनी केले ठरावाच्या बाजूने मतदान

sarpanch of dongaon finally steps down in disbelief | अखेर डोणगावच्या सरपंच पायउतार; अविश्वास पारीत

अखेर डोणगावच्या सरपंच पायउतार; अविश्वास पारीत

संदीप वानखडे, बुलढाणा,  डाेणगाव : मेहकर तालुक्यातील सर्वांत माेठी ग्रामपंचायत असलेल्या डाेणगावच्या सरपंच रेखा पांडव यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव दि. ८ जुलै राेजी पारीत झाला आहे. त्यामुळे त्या पदावरून पायउतार झाल्या आहेत.

डाेणगाव ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा पांडव यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्य भगवानराव बाजड व इतर १२ सदस्यांनी दि. ३ जुलै राेजी तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला हाेता. त्यावर तहसीलदार निलेश मडके यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना नोटीस बजावली होती व दि. ८ जुलैला दुपारी २ वाजता विशेष सभेचे आयोजन केले हाेते. त्यानुसार दि. ८ जुलैला दुपारी २ वाजता सभेचे अध्यक्ष तहसीलदार नीलेश मडके व ग्रामविकास अधिकारी दीपक तांबारे यांच्या समक्ष १७ सदस्यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यात आली.

यावेळी भगवान बाजड व इतर १२ जणांनी सरपंच पांडव यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे अविश्वासात प्रस्ताव पारीत झाला. पांडव यांच्या तीन सदस्यांनी ठरावाच्या विराेधात मतदान केले.

Web Title: sarpanch of dongaon finally steps down in disbelief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sarpanchसरपंच