देऊळगाव राजा तालुक्यात सरपंच निवडीची प्रक्रिया पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:32 AM2021-02-14T04:32:13+5:302021-02-14T04:32:13+5:30
देऊळगाव राजा तालुक्यात एकूण २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारी महिन्यात झाल्या होत्या. निवडणूक निकालानंतर सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. ...
देऊळगाव राजा तालुक्यात एकूण २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारी महिन्यात झाल्या होत्या. निवडणूक निकालानंतर सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ९ फेब्रुवारी, १० फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत प्रशासनाने जाहीर केला होता. देऊळगाव राजा तालुक्यात पहिल्या टप्प्यात ९ फेब्रुवारीला एकाही ग्रामपंचायतीची निवडणूक नव्हती. दरम्यान, १० फेब्रुवारीला १५ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. गुरुवारला ११ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंचपदांसाठी निवडणूक झाली. यामध्ये पिंप्री आंधळे येथे सरपंचपदी अंजली अर्जुनकुमार आंधळे, उपसरपंचपदी सिद्धेश्वर रामकिसन डोईफोडे, बायगाव बुद्रुक येथे सरपंचपदी विमल भास्कर आंधळे, उपसरपंचपदी कविता शिवानंद थोरवे, देऊळगाव मही सरपंचपदी लक्ष्मी रामकिसन म्हस्के, उपसरपंचपदी नफिसाबी सय्यद हबीब, जवळखेड सरपंचपदी अलका बळीराम नागरे, उपसरपंचपदी भगवान ओंकार गवई,
मेंडगाव सरपंच विद्या भगवान कायंदे, उपसरपंच संजय धोंडू साबळे, निमगाव गुरू सरपंच विजय अश्रूबा गुरव,
उपसरपंचपदी मथुरा गणेश चित्ते, टाकरखेड वायाळ येथे सरपंच लीलावती सुखदेव वायाळ, उपसरपंचपदी निवृत्ती गोपाळा खरात, बोराखेडी बावरा येथे सरपंचपदी निर्मला भुजंगराव खरात, उपसरपंचपदी सचिन खुशालराव वाहूळ, सावखेड भोई येथे सरपंच माने नंदा भाऊसाहेब, उपसरपंच ज्योती दीपक जाधव आणि खल्याळ गव्हाण येथे सरपंचपदी कविता बद्रीनाथ दंदाले, उपसरपंच शीतल विनोद खंडागळे यांची निवड करण्यात आली आहे. २६ ग्रामपंचायतींपैकी काही ठिकाणी अविरोध, तर काही ठिकाणी सरपंच, उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले. निवडणूक अध्यासी अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मिरवणूक काढत गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला.