मेहकर तालुक्यात समाधानकारक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:03+5:302021-06-24T04:24:03+5:30
मेहकर : खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने हजेरी लावली. मात्र नंतर उघडीप दिल्याने पेरलेले बियाणे उगवलेच नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त ...
मेहकर : खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने हजेरी लावली. मात्र नंतर उघडीप दिल्याने पेरलेले बियाणे उगवलेच नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. बुधवारी समाधानकारक पाऊस झाल्याने तूर्तास शेतकरी समाधानी झाले आहेत.
खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांनी सर्व तयारी केली होती. सुरूवातीला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. मात्र नंतर पाऊस जोराचे झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे बियाणे निघालेच नाही.तर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली.तर पावसाने उघडीप दिल्याने त्यांचे बियाणे उगवलेच नाही.या दोन्ही कारणांमुळे मेहकर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यांच्या भावाने तर उच्चांक गाठला होता.यामुळे बियाणे व खते यांचा ताळमेळ लावताना शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला होता. यात काही ठिकाणी दुबार पेरणी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाच्या खंडानंतर बुधवारी तालुक्यात पाऊस झाल्याने तूर्तास शेतकरी सुखावला आहे.
मी शेतात पेरणी केली.मात्र अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले. यामुळे मला याच शेतात दुबार पेरणी करावी लागली आहे. सुनील अंबादास तांगडे, शेतकरी,पारडा