सत्यपाल महाराजांचा सत्यवाणी कार्यक्रम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 11:52 PM2017-09-05T23:52:22+5:302017-09-05T23:52:49+5:30
सहकार विद्या मंदिरात बुलडाणा अर्बन परिवार गणेश उत्सव मंडळाच्यावतीने सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणी कार्यक्रमाचे आयोजन ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल : स्थानिक सहकार विद्या मंदिरात बुलडाणा अर्बन परिवार गणेश उत्सव मंडळाच्यावतीने सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणी कार्यक्रमाचे आयोजन ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आ.डॉ.संजय कुटे यांनी केले, तर अध्यक्षस् थानी बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ.किशोर केला हे होते. जि.प. सदस्य मीनाक्षी हागे, जि.प. सदस्य प्रमोद खोद्रे, तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान, माजी जि.प. सदस्य राजेंद्र ठाकरे, कृउबासचे माजी सभापती घनश्याम राठी, सहकार विद्या मंदिराचे स्थानिक सल्लागार भैया बकाल, सरपंच संतोष टाकळकर, लोकेश राठी, अशोक मुरूख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स त्यपाल महाराजांनी प्रबोधन करताना सांगितले, की शेतकर्यांनी खचून जाऊन आत्महत्या करू नये, तर परिस्थितीचा सामना करावा, आपले गाव चांगले ठेवण्यासाठी स्वच्छता राखावी, गावातील कोण त्याही पुरुषाने दारू पिणे टाळावे, जेणेकरून गावात शांतता नांदेल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय मारोडे तर संचालन शिक्षिका वनिता इंगळे यांनी केले. आभार प्राचार्य योगेश घाटोळ यांनी मानले. कार्यक्रमाला वरवट बकालसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली हो ती.