सावरकरांनी समाजाला समतेचा मूलमंत्र दिला: जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:03+5:302021-06-01T04:26:03+5:30
चैतन्यवाडीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मित्र मंडळातर्फे २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती कोरोना नियमाचे पालन करीत ...
चैतन्यवाडीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मित्र मंडळातर्फे २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती कोरोना नियमाचे पालन करीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. विजय जोशी व प्रा. जगदीशचंद्र पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा. जगदीशचंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्र समर्पित होते. हिंदू धर्म संरक्षणासाठी त्यांनी कष्ट घेतलेत. आपण सर्वच भारतीयांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन भारतमातेच्या सर्वांगीण विकासासाठी कर्तव्यदक्ष असले पाहिजे, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी पुष्पमाला अर्पण करून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. याप्रसंगी ॲड. प्रदीप कविमंडन, जी. टी. कुळकर्णी, मुकुंदराव जोशी, बाबासाहेब वरणगावकर, विवेक ढोले, विवेक काळकर, ॲड. अमोल बल्लाळ उपस्थित होते.