सावरखेडनजिक शिवारातील हातभट्टी दारू अड्डय़ावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:48 AM2017-09-26T00:48:06+5:302017-09-26T00:48:45+5:30
अमडापूर : चिखली तालुक्यातील सावरखेडनजीक शिवारामध्ये हातभट्टी दारू पाडून विक्री होते. त्यामुळे सावरखेडनजिक व कव्हळा गावातील महिलांनी काही दिवसांपूर्वी गावातील दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायत सभेत ठराव घेऊन दारूबंदीसंदर्भात अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. त्यानुसार अमडापूर पोलिसांनी या हातभट्टी दारू अड्डय़ावर २५ सप्टेंबर रोजी धाड टाकून २६ हजार रुपयांचा माल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क

सावरखेडनजीक शिवारामध्ये हातभट्टी दारू सर्रास पाडून विक्री होत असल्याने सावरखेडनजिक व कव्हळा गावातील महिलांनी काही दिवसांपूर्वी गावातील दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायत सभेत ठराव घेऊन दारूबंदी करण्यासाठी अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. यावर नव्याने रूजू झालेले ठाणेदार विक्रांत पाटील यांनी आता गावोगावातील अवैधरीत्या दारू विकणार्यांना पकडण्याचा सपाटा लावलेला आहे. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ठाणेदार विक्रांत पाटील यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून पोहेकॉं गजानन पाटील, पोना संजय नागवे, पोका शेख अखतर, नीलेश वाकडे यांनी सावर खेडनजीक शिवारात आरोपी अमोल अनिल नाटेकर रा.कव्हळा व विजय गोविंदा कासारे रा.सावरखेडनजिक यांना हातभट्टी दारू गाळीत असताना रंगेहात पकडून त्यांच्या ताब्यातील हातभट्टी दारू कॅन व मोहा सडवा व साहित्य किंमत २६ हजार रुपये माल पकडून दारू गाळण्यासाठी असलेले डब्बे फोडफाड करून आरोपी अमोल अनिल नाटेकर, विजय गोविंदा कासारे या दोघांविरुद्ध कलम ६५ क फड मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.