सावित्री स्मृतिज्योत मशाल रवाना
By admin | Published: March 9, 2016 02:27 AM2016-03-09T02:27:25+5:302016-03-09T02:27:25+5:30
महिला दिनाचे औचित्य साधून मातृतीर्थावरून सावित्री स्मृतिज्योत मशाल यात्रेस प्रारंभ.
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): जागतिक महिला दिनी विद्येची देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची स्मृतिज्योत मशाल राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या राजवाड्यातून ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता निघाली असून, सातारा जिल्हय़ातील नायगाव येथे सावित्रीबाईच्या जन्मगावी १0 मार्च रोजी सावित्री स्मृतिज्योत पोहचणार आहे.
जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून नगराध्यक्ष गंगा तायडे, उपाध्यक्ष सरस्वती मेहेत्रे, मंदा ठाकरे, निर्मला खांडेभराड यांच्यासह न.प. सदस्यांच्या हस्ते सावित्री स्मृतिज्योत प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे सचिव अविनाश ठाकरे यांनी स्मृतिज्योत रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. तसेच स्मृतिज्योतीच्या माध्यमातून जनजागृती करून नायगाव येथे सावित्री सृष्टी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती अविनाश ठाकरे यांनी दिली.
यावेळी माजी तोताराम कायंदे, दत्ता खरात, डॉ. मांटे, अँड. नाझेर काझी, देवीदास ठाकरे, जगन ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन परमेश्वर मेहेत्रे तर आभारप्रदर्शन जनाबापू मेहेत्रे यांनी केले.