सावित्रीबाइ फुले जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:28 AM2021-01-04T04:28:44+5:302021-01-04T04:28:44+5:30
बुलडाणा : शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहोचविण्याचे काम सावित्रीमाई आणि राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी केले. त्यांच्या त्याग आणि समर्पणामुळेच शासन, ...
बुलडाणा : शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहोचविण्याचे काम सावित्रीमाई आणि राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी केले. त्यांच्या त्याग आणि समर्पणामुळेच शासन, प्रशासनाच्या सर्वोच्चपदी महिला विराजमान झाल्या, असे मत आझाद हिंद कामगार संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष अकिल शहा यांनी व्यक्त केले. सावित्रीमाईंची जयंती व महिला मुक्ती दिनानिमित्त आझाद हिंद महिला संघटना व आझाद हिंद शेतकरी संघटनेकडून ३ जानेवारी रोजी संपर्क कार्यालयात ‘फुले दाम्पत्य देशाचे विद्यापीठ’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आणि भारूडाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शहा यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अॅड सतीशचंद्र रोठे, महिला संपर्कप्रमुख सुरेखा निकाळजे, शेतकरी नेते इमरान शाह, शाहीर सुखदेवराव जाधव, शाहीर शंकर मोरे, शाहीर कांताबाई चव्हाण, विजय चिंचोळकर महाराज उपस्थित होते. प्रारंभी सकाळी ११.३० वाजता सामूहिक माल्यार्पण व ‘गर्जा महाराष्ट्र’ गीताने चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली. तर सायंकाळी पाच वाजता भारुड कार्यक्रमाने समारोप करण्यात आला.
यावेळी आयोजित चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनी सावित्रीमाई व फुले दाम्पत्याच्या त्याग आणि समर्पणावर प्रकाश टाकला. फुले दाम्पत्य देशाचे विद्यापीठ या अनुषंगाने रोठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला शाहीर कांता चव्हाण, द्वारका पवार, पंचफुलाबाई गवई, मीराबाई ढाकरे, शालिनी सोनटक्के, आशा साळवे, सिंधूताई आहेर, कासाबाई काळवाघे, कोकिळाबाई मोरे, संगीता मुळे तसेच शाहीर धोंडू जाधव, रुस्तुम मोरे, किसन चव्हाण यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील सुमित्राताई मुळे, योगिता रोठे, माई कोकाटे, रेणुका जाधव, सुमित्रा सोनटक्के, नारायणराव भाकरे, संजय ढोले, विशाल राणे, सुभाष निकाळजे, समाधान धनवे आदी उपस्थित हाेते. दिल्ली आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना अभिवादन करत राष्ट्रगीताने चर्चासत्राचा समारोप करण्यात आला.