सावित्रीबाई फुले जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:29 AM2020-12-24T04:29:53+5:302020-12-24T04:29:53+5:30

महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाजाच्या वतीने समता परिषदेचे संदीप पांडव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्राहक संरक्षण ...

Savitribai Phule Jayanti will be celebrated as Education Day | सावित्रीबाई फुले जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी होणार

सावित्रीबाई फुले जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी होणार

Next

महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाजाच्या वतीने समता परिषदेचे संदीप पांडव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे मागणी मान्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. मंत्री भुजबळ यांनी सदर मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. देशातील पहिली महिलांसाठी शाळा सुरू केली तर सावित्रीबाईंनी स्वत: शिक्षण घेऊन महिलांना शिकवण्याचे काम केले. स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम फुले दाम्पत्यांनी केले. त्यांच्यामुळेच आज या देशातील महिला शिकल्या व आज विविध क्षेत्रात त्या आपल्या कार्याची चूणूक दाखवित आहेत. त्यामुळे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्म दिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली व ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून येत्या ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा होणार आहे.

Web Title: Savitribai Phule Jayanti will be celebrated as Education Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.