गुड बोला...गोड : बोलाआजकाल गोड बोलणे दुर्लभ होत चाललेय! - राधेश्याम चांडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 04:02 PM2019-01-23T16:02:47+5:302019-01-23T16:03:07+5:30
हल्लीच्या काळात गोड बोलणे दुर्लभ होत आहे. आणि तिळ, गुळ घेऊनही किती लोक गोड बोलतात व गुड बोलतात? माहिती नाही. धर्माप्रमाणे आपली संस्कृती आहे.
हल्लीच्या काळात गोड बोलणे दुर्लभ होत आहे. आणि तिळ, गुळ घेऊनही किती लोक गोड बोलतात व गुड बोलतात? माहिती नाही. धर्माप्रमाणे आपली संस्कृती आहे. त्यातच मकर संक्रांतीचा हा सणही तसा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपले काम करताना गोड बोलणे गरजेचे आहे. वर्तमान काळात परिस्थितीती बदलत आहे. समाजामध्ये आज नास्तिकता वाढत आहे. त्यामुळे देवावरचा विश्वास कोठेतरी ढासळत असल्याचे जाणवत आहे. अशा स्थितीत आपल्या परंपरा या मानसिक स्वास्थ्य टिकविण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या ठरतात. त्याप्रमाणेच मकर संक्रांतीचा हा सण आहे. ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असे या सणाच्या दिवशी आपण सहजतेने म्हणून जातो. मोठ्यांना आदराने छोटे तिळ, गुळ देऊन त्यांच्या प्रती असलेली आदराची भावना प्रगट करतात. या माध्यमातून एक चांगला संवाद होतो. कौटुंबिक संवादाला तथा शेजारच्यांशी या माध्यमातून सकारात्मक संवाद होण्यास चालना मिळते. वर्तमानातील वाढती नास्तीकता पाहता आपल्या भारतीय संस्कृतीत घालून दिलेली ही परंपरा सामाजिक बंध घट्ट करण्यासाठीची एक महत्त्वाची परंपरा आहे. या गोड बोलल्याने गुड अर्थातच चांगली कामे सहजतेने पूर्णत्वास जातात. समाजात वाढती नास्तिकता पाहता आपल्या संस्कृतीत या सणाच्या माध्यमातून घालून दिलेली परंपरा सामाजिक, कौटुंबिक धागा अधिक घट्ट करण्यास मदत होते. गोड बोलण्यासोबतच गुड बोलल्याने अशक्य कामेही सहजतेने मार्गी लागतात.