गणेश मंडळाच्यावतीने स्कूल बॅग वाटप
By admin | Published: September 21, 2016 02:22 AM2016-09-21T02:22:44+5:302016-09-21T02:22:44+5:30
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपक्रम
देऊळगावराजा(जि. बुलडाणा), दि. २0- शासनाकडून शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी पोषण आहार, विनामूल्य पुस्तके, मुलींसाठी बससेवा असे विविध योजना राबवित आहे. मागील वर्षी शासनाकडून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले, असे उपक्रम सुरु आहे; पण स् थानिक शिवद्वार गणेश मंडळाच्यावतीने २0 सप्टेंबर रोजी शहरातील विविध शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करुन अनोखा उपक्रम राबविला. यावेळी अध्यक्षस्थानी देऊळगावराजा शिक्षण संस्थेचे सचिव सुबोध मिश्रीकोटकर होते. देऊळगावराजा हायस्कूलच्या सभागृहात शिवद्वार गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एपीआय मंजूषा मोरे, डॉ. कायंदे, सुषमा राऊत, आयसीआय क्लासेसचे फुके, प्राचार्य थोरवे, शेवाळे सर, यांची उपस्थिती होती. दर वर्षीप्रमाणे यंदाही अहिंसा मार्गावरील शिवद्वार चौकात गणेशाची स्थापना करण्यात येत आहे. या उत्सवा दरम्यान जमा होणारी रक्कममधून सतत पाच वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतात. यावर्षी देऊळगावराजा हायस्कूल, आमेना अजिज उर्दू हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल, दीनदयाळ विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांंना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी हा अनोखा उपक्रम शिवद्वार गणेश मंडळाच्या अध्यक्ष तेजस रोडे यांच्या नेतृत्वात आणि मान्यवरांच्या हस्ते सीमा गायकवाड, वैशाली कांबळे, तुषार दहेकर, मारोती पवार, गौरी रायलकर, वैष्णवी सोनूने आदी विद्यार्थ्यांंना स्कूल बॅग वाटप करण्यात आले.