बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल
By admin | Published: July 19, 2014 12:35 AM2014-07-19T00:35:18+5:302014-07-19T00:53:05+5:30
खामगाव तालुक्यातील बसफेर्यांची कमतरता : विद्यार्थी शाळेत पोहचतात उशिरा
खामगाव: शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी दररोज ८ हजाराच्या जवळपास विद्यार्थी एसटीने येणे-जाणे करतात. तालुक्यासह इतर ठिकाणाहुन विद्यार्थ्यांचा लोंढा खामगाव कडे वाढत असला तरी या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी असलेल्या एस टी बसेस मात्र कमी पडत आहेत.
खामगाव शहरात विविध शाळा, महाविद्यालये, आयटीआय, पॉलिटेकनिक कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज, कॉम्पुटर क्लासेस, टायपिंग क्लासेस, यासोबतच इतर शिक्षणाकरीता खामगाव तालुक्यासह नांदुरा, मोताळा, उंद्री अमडापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, देऊळगाव साकर्शा आदि ठिकाणाहुन दररोज ८ हजार विद्यार्थी ये-जा करीत आहेत. खामगाव आगारातुन या विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी पासेस दिल्या जातात. खामगाव आगाराला विद्यार्थ्यांच्या पासेसमधुन दररोज १ लाखा पेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. मात्र या विद्यार्थ्यांंना एस टी मधुन प्रवास करतांना अक्षरश: झगडावे लागत असल्याचे विदारक चित्र एसटी बस मध्ये पहावयास मिळते. सकाळी ११ वाजता शाळेत येणार्या विद्यार्थ्यांसाठी तर एसटी मध्ये बसण्यासाठी स्पर्धाच असते. अनेक बसथांब्यावर २0-२५ विद्यार्थी बस येण्याची वाट पाहत ताटकळत उभे असतात. अगोदर एस टी बस इतर प्रवाशांनी खच्च भरलेली असतांना विद्यार्थांंनी कोठे बसावे असा प्रश्न उपस्थित होतो. खामगाव ते मेहकर, लाखनवाडा, शहापुर, माटरगाव, उंद्री, या मार्गे जाणार्या विद्यार्थ्यांंची कसोटीच असते.
सायंकाळी शाळेतुन परतत असणार्या विद्यार्थ्यांंची तर खुपच हेळसांड होते. विद्यार्थ्यांंचे जत्थेच्या जत्थे खामगाव बसस्थानकावर पहावयास मिळतात. एखाद्या मार्गे उशिरा गाडी धावल्यास विद्यार्थ्यांंना थांबण्यावाचुन पर्याय नसतो. विद्यार्थ्यांंची समस्या लक्षात घेता खामगाव आगाराने ग्रामीण भागाकरीता बसफेर्या वाढविण्याची मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंची आहे.
*शाळेच्या वेळेत हवे बसफेर्याचे नियोजन
दिवसेंदिवस शिक्षणासाठी शहराकडे विद्यार्थ्यांंचा कल वाढला आहे. त्यामुळे ग्रामिण भागातुन हजारो विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी एस टी बस मधुन पासेसद्वारे प्रवास करतात. सकाळी ११ वाजता शाळेत येतांना तसेच सायंकाळी ५ वाजेनंतर घरी जाता वेळेस विद्यार्थ्यांंना बसची आवश्यकता आहे. मात्र नेमक्या याच वेळेस विद्यार्थ्यांंना प्रवासासाठी झगडावे लागते. खामगाव आगाराने विद्यार्थ्यांंंच्या सोयीकरीता शाळेच्या यावेळेत बसफेर्यांचे नियोजन करुन विद्यार्थ्यांंचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.