जिल्हा परिषदेत भरली शाळा
By Admin | Published: September 10, 2014 02:10 AM2014-09-10T02:10:00+5:302014-09-10T02:10:00+5:30
चिखली तालुक्यातील किन्होळा येथील उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत आंदोलन केले.
बुलडाणा : चिखली तालुक्यातील किन्होळा येथील खासगी शाळेला विरोध करून जिल्हा परिषदेने आठवीचा वर्ग सुरू करावा, या मागणीसाठी उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज, ९ सष्टेंबर रोजी आंदोलन केले. चिखली तालुक्यातील ग्राम किन्होळा येथे खासगी उर्दू हायस्कूलला परवानगी देण्यात आली आहे; परंतु अनेक पालकांनी या शाळेतून आपल्या मुलांची नावे काढून घेतली आहेत. जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलच्या जवळपास २५ विद्यार्थ्यांनी आठव्या वर्गात प्रवेश घेतला होता; मात्र अनेक विद्यार्थ्यांनी शाळेतून प्रवेश रद्द केला आहे; तसेच गावात उर्दू माध्यमाची जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवा वर्ग सुरू करण्याची मागणी केली आहे. आज रोजी किन्होळा येथील विद्यार्थ्यांचे शाळेत नाव नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे किन्होळा ग्रामस्थांनी मुलांसह जिल्हा परिषदेत धडक दिली व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर आंदोलन केले.