शालेय पोषण आहाराचा पालकांकडेच दिला जातो तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:22+5:302021-02-07T04:32:22+5:30
खिचडी झाली बेचव शहरातील लाभार्थी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात शालेय पोषण आहारात केवळ तांदूळ दिले जात होते. यामुळे केवळ तांदूळ ...
खिचडी झाली बेचव
शहरातील लाभार्थी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात शालेय पोषण आहारात केवळ तांदूळ दिले जात होते. यामुळे केवळ तांदूळ बनवून खाणे हे विद्यार्थ्यांना रुचकर लागत नाही, तर ग्रामीण भागातही तूरडाळ मिळत नसल्याने खिचडीची चवच निघून गेली आहे. खिचडीसाठी लागणारे साहित्य मीठ, मिरची पावडर, जिरे, हळद, गोडतेल हेही देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरात ही खिचडी बनलीच नाही.
प्रति विद्यार्थी विरतणाचे प्रमाण
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्याना मूगदाळ १.३०० किलोग्रॅम, हरभरा १.२०० किलोग्रॅम व तांदूळ ५ किलो ग्रॅम दिला जातो. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मूगदाळ १.८०० किलो ग्रॅम, हरभरा २ किलो ग्रॅम, तांदूळ ७ किलो ५०० ग्रॅम असे प्रति विद्यार्थी वितरणाचे प्रमाण आहे.
जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी : २,६८,२३६
पहिली ते पाचवी : १,५८,४६३
सहावी ते आठवी: १,०९,७७३