शाळा बंद आंदोलनाला प्रतिसाद
By admin | Published: December 13, 2014 12:16 AM2014-12-13T00:16:23+5:302014-12-13T00:16:23+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील ४२५ शाळेतील शिक्षक कर्मचा-यांचा सहभाग.
बुलडाणा : संपूर्ण राज्यातील ४५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरविणारा, विद्यार्थ्यांंना त्यांच्या विषयाचे शिक्षक मिळण्याचे अधिकार नाकारणारा तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्यांची पदे मोठय़ा प्रमाणात कमी करणारा जाचक अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात शिक्षण संस् थाचालक मंडळाच्या वतीने शुक्रवारी १२ डिसेंबर २0१४ रोजी कडकडीत शाळा बंद ठेवण्यात आल्या. याला जिल्ह्यातील शिक्षण संस् थांनी प्रतिसाद देत आपल्या शाळा बंद ठेवल्या.
या बंदमध्ये जिल्ह्यातील सुमारे ४५0 पैकी ४२५ शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. जिल्ह्यातील सुमारे ६५00 शिक्षकांपैकी ६ हजार शिक्षकांनीही या बंदला पाठिंबा दर्शवित कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे जिल्हाभरातील शाळांमध्ये शुकशुकाट दिसून आला. या बंदमध्ये जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षक आघाडी, विज्युक्टा, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ सहभागी झाले. या बंद संदर्भात शिक्षण संस् थाचालक मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांंत शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रासंदर्भात अ त्यंत परस्परविरोधी शासन निर्णय काढण्यात येत आहेत. यामुळे शिक्षण व्यवस्था मोडकळीस येत आहे. नियमबाह्यरित्या शाळांची पटपडताळणी करण्यात आली व त्यानुसारच शिक्षकांची संचमान्यताही सदोष पद्धतीने करण्यात आली आहे. या सदोष पद्धतीमुळे राज्यातील सुमारे ४५ हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरविण्यात आले. याशिवाय समायोजन करताना विशिष्ट शाळेतील विषय शिक्षकाची विद्यार्थ्यांंंची गरज लक्षात न घेता केले जात आहे. तसेच आरक्षणासंदर्भातील अनुशेषालाही हरताळ फासला जात आहे. गेल्या दहा वर्षांंपेक्षा जास्त कालावधीपासून शाळांचे वेतनेतर अनुदान दिले गेले नाही.