ट्रॅक्टरच्या धडकेत स्कूटरचा चुराडा; जीवित हानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:45 PM2019-05-08T12:45:14+5:302019-05-08T12:45:58+5:30
खामगाव : जनुना तलावातील गाळ घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत स्कूटर चकनाचूर झाल्याची घटना ८ मे रोजी सकाळी घडली.
खामगाव : जनुना तलावातील गाळ घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत स्कूटर चकनाचूर झाल्याची घटना ८ मे रोजी सकाळी घडली. यामध्ये स्कूटरवर बसलेला युवक बालबाल बचावला.
तलावातील गाळ काढण्याचे काम गुढीपाडव्यापासून सुरू आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये घेऊन जात आहेत. गाळ घेऊन जाण्यासाठी खाजगी ट्रॅक्टर चा वापर केला जात आहे. जनुना तलावाजवळील रस्ता हा नेहमी वर्दळीचा राहतो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून नेहमी वर्धळ राहते. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी इंडिका आणि ट्रॅक्टरची धडक झाल्याची घटना ताजी असतानाच आज परत आठ मे रोजी सकाळी स्कुटर क्रमांक 6131 व मोटारसायकल क्रमांक 5539 यांना गाळ घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने जबर धडक दिली. यामध्ये स्कूटरचा चुराडा झाला आहे. तर मोटरसायकल काही अंतरापर्यंत फेकल्या गेली. स्कुटवर वेदांत योगेश शर्मा हा बसलेला होता, मात्र त्याने प्रसंगावधान साधत उडी मारल्याने तो बालबाल बचावला.
ट्रॅक्टर चालकांना समज देण्याची गरज
या घटनेची दखल घेऊन पालिका प्रशासन व रोटरी क्लबने तलावावरून गाळ घेऊन जाणाऱ्या चालकांना समज देण्याची गरज निर्माण झाली आहे. हा रस्ता रहदारीचा असल्याने वाहन चालकांनी सुद्धा वाहने सांभाळून चालवणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळता जातील. शिवाय याठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे.