‘कृषी संजीवनी’ची व्याप्ती वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 04:44 PM2019-09-20T16:44:34+5:302019-09-20T16:44:39+5:30
आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांनाही कृषी संजीवनीचा लाभ मिळणार असल्याने जिल्ह्यात याची व्याप्ती वाढणार आहे.
-ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे १ हजार ८ शेतकरी लाभार्थी आहेत. आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांनाही कृषी संजीवनीचा लाभ मिळणार असल्याने जिल्ह्यात याची व्याप्ती वाढणार आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविण्यात येतात. अनेक शेतकरी शेतीबरोबरच विविध व्यवसायही करत आहेत. शेतकºयांना शेतीसोबतच पूरक व्यवसायाला हातभार लागण्याच्या दृष्टीने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू आहे. विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि हवामान बदलास अतिसंवेदनशील असणारी चार हजार गावे व विदर्भातील पूर्णा नदी खोºयातील खारपाणपट्टयातील ९३२ गावे अशा एकूण पाच हजार १४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात २०१८ पासून आतापर्यंत ३९६ गावांमध्ये या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
१९ सप्टेंबपर्यंत या योजेलचा १ हजार ८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. परंतू या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याच्या प्रस्तावास नुकतीच मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी संख्येत आता चांगलीच वाढ होणार आहे. हा प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकºयांबरोबरच पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकºयांना वैयक्तीक लाभाच्या घटकांसाठी लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये परसातील कुक्कुटपालन, शेततळे, ठिबक सिंचन, पीव्हीसी/एचडीपीई पाइप, शेडनेटमधील लागवड साहित्य, बिजोत्पादन, फळलागवड, बंदिस्त शेळीपालन, तुषार सिंचन, विद्युत मोटार, विहिर पुनर्भरण, शेडनेट या घटकांसाठी शेतकºयांना लाभ दिला जात आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली आहे. तसे पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकºयांना लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे.
- उमेश जाधव,
प्रकल्प विशेषज्ञ, (कृषी),
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, बुलडाणा.