स्कॉर्पिओची काळी-पिवळींना धडक

By Admin | Updated: December 11, 2014 01:22 IST2014-12-11T01:22:53+5:302014-12-11T01:22:53+5:30

१७ जण जखमी : दारु पिऊन भरधाव वाहन चालविण्याने घडला अपघात.

Scorpio's black-yellow strikes | स्कॉर्पिओची काळी-पिवळींना धडक

स्कॉर्पिओची काळी-पिवळींना धडक

खामगाव (बुलडाणा) : मद्यप्राशन करुन भरधाव वाहन चालवित असलेल्या स्कॉर्पिओ चालकाने दोन काळी-पिवळींना धडक दिली. यामध्ये या दोन्ही वाहनातील १७ जण जखमी झाले. ही घटना बुधवार, १0 डिसेंबर रोजी बुलडाणा-खामगाव रस्त्यावर वाघळी फाट्यानजीक संध्याकाळी ७.३0 वाजताचे सुमारास घडली. भोकरदन येथील सोमीनाथ बनारसे हा दारुच्या नशेत आपल्या ताब्यातील स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एमएच २0 बीसी १२२३ ने सिल्लोड कडे जात होता. दरम्यान सोमीनाथ बनारसे याचे आपल्या ताब्यातील भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने वाघळी फाट्यानजीक काळी-पिवळी टॅक्सी क्र. एमएच २८ एच २९७३ ला जबर धडक दिली. या धडकेनंतर काळी-पिवळी टक्सी उलटली. तर अपघातानंतरही स्कॉर्पिओ चालक बनारसे हा आपल्या ताब्यातील वाहनासह पसार झाला. त्यानंतर थोडे अंतर पुढे गेल्यावर याच स्कॉर्पिओ चालक बनारसे याने एमएच २८ आर ६७८ या क्रमांकाच्या काळी-पिवळी टॅक्सीला सुध्दा जबर धडक दिली. या दोन्ही अपघातात सिल्लोड येथील संदीप दामोदर चव्हाण (वय ३४), संगीता सुनिल सुरडकर (३६), रागीनी सावळे(४0), शिला पांडुरंग रेठेकर (४0), सचिन केशव मेहसरे, आनंदा दिनकर गावंडे रा.पहुरजिरा, अरविंद रामरतन सरोदे (४८) रा.खामगाव, सिल्लोड येथील भावेश सुनिल सुरडकर, सुनील रंगनाथ फुंडकर, कोमल सुनील सुरडकर, कविता संदीप चव्हाण (२४), वेदांत संदीप चव्हाण (८), अरूण शालीकराम भागवत (४८), सायराबी शे. अन्सार, काळी-पिवळीचालक मोहम्मद जियाउल्ला खान रहीम खान रा.गोंधनापूर ता.खामगाव, दुसर्‍या काळी-पिवळीचा चालक मनवर मिर्झा अकबर मिर्झा (रा.शंकर नगर खामगाव) हे जखमी झाले.

Web Title: Scorpio's black-yellow strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.