शिल्पकला: कल्पनेतून वास्तवाकडे जाण्याचा मार्ग - प्रा.मधुकर वंजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 04:24 PM2020-02-22T16:24:16+5:302020-02-22T16:24:25+5:30

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क    खामगाव : मनुष्याच्या डोक्यातील अमूर्त कल्पनेला मूर्त स्परूप देण्याचे माध्यम शिल्पकला होय. ...

Sculpture: The path from fiction to reality - Prof. Madhukar Vanjari | शिल्पकला: कल्पनेतून वास्तवाकडे जाण्याचा मार्ग - प्रा.मधुकर वंजारी

शिल्पकला: कल्पनेतून वास्तवाकडे जाण्याचा मार्ग - प्रा.मधुकर वंजारी

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
  खामगाव : मनुष्याच्या डोक्यातील अमूर्त कल्पनेला मूर्त स्परूप देण्याचे माध्यम शिल्पकला होय. शिल्पकलेत ध्यानस्थ अवस्था लाभते.शिल्पकलेला प्राचीन इतिहास असून आधुनिक युगातही शिल्पकलेचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. शिल्पकला क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मुंबई येथील जे.जे.स्कूल आॅफ आर्ट, शिल्पकला विभागाचे प्रमुख प्रा. मधुकर वंजारी यांच्याशी टिळक राष्ट्रीय विद्यालय, खामगाव येथे साधलेला संवाद...


 शिल्पाचे पामुख्याने प्रकार कीती?
शिल्पांचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात.
राऊंड शिल्प- हे शिल्प आपल्याला सर्व बाजूंनी पाहता येतं. उदा. महापुरुषांचे पुतळे आणि दुसरे उठाव शिल्प- हे शिल्प एकाच बाजूने पाहता येते थोडक्यात इमारतीवरील शिल्प होय.


आपल्या कला क्षेत्रातील प्रवासाबद्दल काय सांगाल?
शेंदुरजना घाट ता. वरूड जि.अमरावती हे माझं मुळ गाव. येथे १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या संधीसाठी मुंबई येथे गेलो. तिथे जे.जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये चित्रकलेचा छंद वर्गाशी जुळलो. चित्रकला शिक्षक विजय बिजवे यांच्या मार्गदर्शनामुळे शिल्पकलेशी एकरूप झालो. जे.जे. स्कूल आॅफ आर्टमध्येच अधिव्याख्याता म्हणून रूजू झालो. १२ वर्षांपासून तेथे शिल्पकला विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे. शिल्पकलेमुळे माझ्या समोरील रोजगारासोबतच भविष्याचीही चिंता मिटली.


 आपल्या मागदर्शनात तयार झालेल्या विद्यार्थ्यांबाबत काय सांगाल?
पूर्वीपेक्षा चित्रकला आणि शिल्पकला क्षेत्रांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढता आहे. जे.जे.स्कूल आॅफ आर्ट मध्ये २९ वर्षांच्या सेवेत अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचं भाग्य लाभले. यामध्ये शिल्पा गुप्ता, मुंबई या विद्यार्थीनीने ‘व्हीडीओ मांडणी’शिल्प कलेत जागतिक स्तरावर नाव लौकीक मिळवून दिला.  वलय शेंडे, नागपूर आणि संदिप पिसाळकर यांनी संघर्षातून आपली वाट चोखाळली.

भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकलेला पुरातन इतिहास आहे. इ. स. पूर्व ६ व्या शतकापासून या कलांचा इतिहास अखंडितपणे पाहावयास मिळतो. याची माहिती आपणाला तत्कालीन अवशेष आणि साहित्याद्वारे प्राप्त होते.प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर धर्माचा खूप मोठा प्रभाव होता.

शिल्पकलेचा अभ्यासक्रम कोणत्या विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे. ?
प्राचीन मंदिरांवरील मनमोहक कलाकृतींमुळे आपल्याला त्या काळातील शिल्पकलेचा अंदाज येतो. शिल्पकला खूप जुनी असली तरी सद्यस्थितीत या कलेला चांगलाच वाव आहे. सेट डिझायनिंग आणि थ्री.डी अ‍ॅनिमेशन यासारख्या करिअरच्या नव्या संधी शिल्पकलेला खुणावताहेत. महाराष्ट्रात जे.जे.स्कूल आॅफ आर्ट्स मुंबई, सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट्स, जि.रत्नागिरी, कलाचार्य पंधेगुरुजी कलाविद्यालय, खामगाव, कलामंदिर महाविद्यालय, कोल्हापूर, ललित कला महाविद्यालय,नाशिक या पाच ठिकाणी हा अभ्यासक्रम चालविला जातो. 

Web Title: Sculpture: The path from fiction to reality - Prof. Madhukar Vanjari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.