खामगाव, शेगावातील सावकारांच्या घराची झडती
By सदानंद सिरसाट | Published: February 15, 2024 09:47 PM2024-02-15T21:47:03+5:302024-02-15T21:47:47+5:30
कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.
सदानंद सिरसाट, खामगाव (बुलढाणा): अवैध सावकारीच्या तक्रारी प्राप्त झाल्याने खामगाव, शेगाव शहरातील सावकारांच्या घरांची झडती घेण्यासाठी सहकार विभागाच्या पथकाने गुरुवारी धाव घेतली. यावेळी आक्षेपार्ह कागदपत्रे, दस्तऐवज व धनादेश असे एकूण ५२ दस्त जप्त करण्यात आले. तर खामगाव शहरातील कमलेश अशोक टावरी, प्रतिभा अशोक टावरी बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या तीन खोल्या, तीन कपाटे सीलबंद करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.
जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांच्या आदेशाने सावकारी पथकाने ही झडती घेतली. खामगाव येथील घनश्याम नेभनदास गुरुबाणी व दीपक मोतीराम गुरुबाणी यांनी तक्रार केली. त्या तक्रारीतील गैरअर्जदार अशोक गोपीकिसन टावरी (मयत), कमलेश अशोक टावरी, प्रतिभा अशोक टावरी, रायगड कॉलनी, तसेच अर्जदार श्याम बलदेव शाहू, दीपक बलदेव शाहू, मिलिंद श्याम शाहू, शेगाव यांचीही तक्रार होती. त्यानुसार गैरअर्जदार न्यू. मोबाइल वर्ल्ड, रवी चंदुलाल हेमनाणी व दिलीप हेमनाणी, छ. शिवाजी चौक, शेगाव, रमेश जगदीश प्रसाद चांडक, भैरव चौक, शेगाव यांच्या घरी पथक पोहोचले. त्याशिवाय, अर्जदार विठ्ठल दिलीप अवळे, इतर ५, रा. माखरीया मैदान, खामगाव यांच्या तक्रारीवरून संगीता संजय सोळंके, सोनाक्षी संजय सोळंके, रा. माखरीया मैदान, खामगाव या ठिकाणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये अधिकाराचा वापर करून झडती घेतली. त्यामध्ये गैरअर्जदारांच्या घरातून तसेच आस्थापनेतून संशयास्पद कोरे चेक, कोरा बाँड पेपर, हिशेबाच्या नोंदवह्या जप्त करण्यात आल्या.
- चार पथकांनी घेतली झडती
या कारवाईसाठी चार पथकांची नियुक्ती केली होती. पथक क्रमांक १ मध्ये यु.के. सुरडकर, प्रमुख तथा डी.एम. चौधरी, डी.बी. बोंडे व एस.एस. बाहेकर, एन.एस. सोनुने, ए.आर. ढोरे, जी.आर. दहीभात, एन.एम. वाघमारे, पथक क्रमांक-२ मध्ये प्रमुख ए.एस. खंडारे, वाय.एम. घुसळकर, आर.ए. डहाके, ए.एच. भांबेरे, व बी.एस. गुप्ता, पथक क्रमांक ३ मध्ये प्रमुख एस.सी. अग्रवाल, आर.बी. बाबर, जी.टी. सुरडकर, जी.एस. गाढे, आर.बी. सिरसाट, ए.व्ही. तरमळे व एस.बी. खोडके, तर पथक ४ मध्ये प्रमुख एस.पी. जुमडे, के.एस. गावंडे, एस.के. चौरे, एस.के. घाटे, एस.एस. पवार व सी.एम. गोंधळेकर, पथकातील पंच म्हणून एस.एच. चिंचोले, आर.आर. सदार, डी.आर. महाले, एस.एस. कोळसे, व्ही.एम. गोसावी, एस.व्ही. किलबिले, एस.पी. पवार व एस.बी. तायडे यांचा सहभाग होता. तसेच पोलिस कर्मचारी कविता मोरे, किरण साबळे, सीमा पवार, हिना खान, विक्की खरात, दीपक जाधव, केशव घुबे, तायडे साहेब, पल्लवी कड सहभागी होते.