गोळीबार प्रकरणातील दुसरा आरोपी अटकेत

By Admin | Published: July 5, 2017 12:37 AM2017-07-05T00:37:16+5:302017-07-05T00:37:16+5:30

मलकापूर : मुख्याध्यापकावर गोळी झाडल्याप्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

The second accused in the firing case | गोळीबार प्रकरणातील दुसरा आरोपी अटकेत

गोळीबार प्रकरणातील दुसरा आरोपी अटकेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : येथील चर्चेचा विषय मुख्याध्यापकावर गोळी झाडल्याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी ३ रोजी दुसऱ्या आरोपीस अटक केली. या प्रकरणात आरोपींची संख्या दोन झाली असून, या दोघांनाही एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे यांनी दिली.
यासंदर्भात घटनाक्रम असा की, मोताळा तालुक्यातील भिकमसिंह पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्रसिंह गुलाबसिंह राजपूत यांच्यावर त्यांच्या महाराणा प्रताप नगरातील राहत्या घरासमोर मोबाइलवर बोलत असताना पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने गोळी झाडल्याची घटना २८ जूनच्या रात्री १०.४० वा. सुमारास घडली. त्यामुळे मलकापूर शहरात एकच खळबळ उडाली होती.
या घटनेत वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील झाले होते. मलकापूर पोलिसांनी पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे यांच्या नेतृत्वात २९ जून रोजी या प्रकरणातील दोघांपैकी एक असलेल्या सावनसिंह मदनसिंह राजपूत याला अटक केली. त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मलकापूर न्यायालयाने दिला
दुसऱ्या आरोपीच्या तपासात पोलीस यंत्रणा होती. त्यात संदीप ऊर्फ नाना ओंकार येसी या दुसऱ्या आरोपीस पोलिसांनी ३ जुलै रोजी अटक केली. आज ४ जुलै रोजी गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपींना एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, गोळीबार प्रकरणातील गंभीर जखमी मुख्याध्यापक रवींद्रसिंह गुलाबसिंह राजपूत यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे शल्यचिकित्सक डॉ.अरविंद कोलते यांनी सांगितले. संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या या गोळीबार प्रकरणात दोन्ही आरोपींचा अवघ्या चार दिवसात छडा लावण्यात मलकापूर पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे व सहकाऱ्यांना यश आल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे.

Web Title: The second accused in the firing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.