खामगावात तीन तलाकचा दुसरा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 11:09 AM2021-08-07T11:09:20+5:302021-08-07T11:09:28+5:30
Second case of triple talaq filed in Khamgaon : तीनवेळा 'तलाक म्हणून निघून गेला, अशी तक्रार महिलेने शिवाजीनगर पोस्टेला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: विवाहितेला माहेरवरून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. त्याचप्रमाणे तिला माहेरी सोडून पतीने तीनवेळा तलाक म्हणत ‘तलाक’ दिला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरूध्द शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सजनपुरीतील फरहिनाबानो (२०) हिचा विवाह जळगाव जामोद येथील अर्शद खान याच्यासोबत झाला होता. दरम्यान लग्न झाल्यानंतर तीन ते चार दिवसानंतरच अर्शद खान शफीउल्ला खान, शमा खातून, शफीउल्ला खान, अहेमद खान शफीउल्ला खान, फिरदोस खान शफीउल्ला खान यांनी पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर पती अर्शद खान याने विवाहितेला घरी सोडून देत तीनवेळा 'तलाक म्हणून निघून गेला, अशी तक्रार महिलेने शिवाजीनगर पोस्टेला दिली. यावरून पोलिसांनी चौघांविरूध्द विविध कलमान्वये तीन तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. यापुर्वीही खामगावातही एक तीन तलाकचा गुन्हा दाखल झाला आहे.