राज्यातून ‘एकलारा’ ठरला द्वितीय
By Admin | Published: July 14, 2017 12:44 AM2017-07-14T00:44:02+5:302017-07-14T00:44:02+5:30
पशु संवर्धन मंत्री जानकर यांची एकलारा पशु वैद्यकीय दवाखान्यास भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : एकलारा पशु वैद्यकीय दवाखाना हा आयएसओ मानांकनामध्ये राज्यातून द्वितीय ठरला असून, या पशु वैद्यकीय दवाखान्याची पशु संवर्धन मंत्री जानकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
७ जुलै रोजी शिवाजी सभागृहात राज्याचे पशु संवर्धन मंत्री महादेवराव जानकर, जि.प.अध्यक्ष उमा तायडे, उपाध्यक्ष मंगला रायपुरे, कृषी व पशु संवर्धन सभापती दिनकर बापू देशमुख, समाजकल्याण सभापती डॉ.गोपाल गव्हाळे, रा.स.पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता खरात, पं.स. सभापती चिखली संगीता संजय पांढरे यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र सोहळा पार पडला. एकलारा पशुवैद्यकीय दवाखाना हा राज्यातून द्वितीय ठरला आहे. जानकर यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यातील उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले. संस्थाप्रमुख डॉ.किरण सोनुने यांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी अधिकारी षण्मुखराजन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बुलडाणा, पशु संवर्धन विभागाचे अमरावती विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.प्रकाश चव्हाण, उपायुक्त डॉ.विलास जायभाये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनील पसरटे, तसेच जिल्हा परिषदेतील संपूर्ण विभागाचे खातेप्रमुख डॉ.शिवाजी पवार, आरोग्य विभाग उप.मु.का.अ. महिला बाल कल्याण मेश्रा, उप मु.का. पंचायत चोपडे, डॉ.संदीप राठोड, चिखली येथील गटविकास अधिकारी भुजबळ, ताकभाके, डॉ.मोरे, डॉ.रगतवान उपस्थित होते. आयएसओ नामांकन मिळविण्यासाठी डॉ.किरण सोनुने, अनिल सावळे, अशोक भुसारी, हरीश घेवंदे यांनी परिश्रम घेतले.