मेहकर तालुक्यातील सरपंच, उपसरपंचाची दुसऱ्या टप्प्यातील निवड प्रक्रिया पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:32 AM2021-02-12T04:32:39+5:302021-02-12T04:32:39+5:30
मेहकर तालुक्यात ४१ पैकी ३९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील १० फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका ...
मेहकर तालुक्यात ४१ पैकी ३९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील १० फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये गजरखेड येथे सरपंचपदी ज्ञानेश्वर अंबादास सुरुशे, तर उपसरपंचपदी गोदावरी परमेश्वर गिऱ्हे, वरुड येथे सरपंचपदी छायाबाई जगदेव नाईक, उपसरपंचपदी कुंडलिक भिका राठोड, पांगरखेड येथे सरपंचपदी सुधाकर मधुकर धंदरे, गणपूर येथे सरपंचपदी सदाशिव गोविंदा चव्हाण, उपसरपंचपदी जयश्री रवी डोंगरदिवे, बोथा येथे सरपंचपदी माला रोहिदास जाधव, उपसरपंचपदी ज्ञानेश्वर रमेश लठाड, सावत्रा येथे सरपंचपदी किशोर रामजी इंगळे, उपसरपंचपदी नारायण निवृत्ती निकस, नायगाव दत्तापूर येथे सरपंचपदी रामदास देवराव वारकरी, उपसरपंचपदी गणेश विष्णू चिपडे, गोमेधर येथे सरपंचपदी दीपाली सुभाष अवसरमोल, उपसरपंचपदी अनिल बाबूराव मंजुळकर, बोरी येथे सरपंचपदी ज्योती अनंता चनखोरे, उपसरपंचपदी शेषराव उत्तम काटे, गोहगाव येथे सरपंचपदी वर्षा प्रमोद काळे, उपसरपंचपदी शेख सद्दाम साबुद्दिन, आरेगाव येथे उपसरपंचपदी विठ्ठल परसराम साखरे, विश्वी येथे सरपंचपदी सुवर्णा संतोष जाधव, उपसरपंचपदी प्रकाश शंकर श्रीकाळ यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अध्यासी अधिकारी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांनी काम पाहिले.
आरेगाव येथे उपसरपंचावर जबाबदारी
आरेगाव येथे अनुसूचित जमातीकरिता सरपंचपद राखीव होते. या ठिकाणी या प्रवर्गाचा उमेदवार नसल्यामुळे आरेगाव येथील हे पद रिक्त झाले आहे. या ठिकाणी निवडून आलेले उपसरपंच हे ग्रामपंचायतीचा कारभार पाहतील.