पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचा दुस-या सत्राचा शुभारंभ

By admin | Published: April 3, 2017 03:18 AM2017-04-03T03:18:06+5:302017-04-03T03:18:06+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष उमा शिवचंद्र तायडे यांचे हस्ते बालकांना पोलिओचा डोस पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

The second session of the Pulse Polio Vaccination Campaign launched | पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचा दुस-या सत्राचा शुभारंभ

पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचा दुस-या सत्राचा शुभारंभ

Next

बुलडाणा, दि. २- पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २ एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र उमाळी येथील लसीकरण बुथवर जिल्हा परिषद अध्यक्ष उमा शिवचंद्र तायडे यांचे हस्ते बालकांना पोलिओचा डोस पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत आपल्या प्रास्ताविक भाषणात सविस्तर माहिती दिली. तसेच जि.प. अध्यक्ष उमा तायडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्ह्यातील 0 ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ बुथवर पोलिओचा डोस पाजण्याकरिता पालकांनी घेऊन जावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मलकापूर पंचायत समितीच्या उपसभापती सीमा बगाडे, आनंदराव क्षीरसागर, कविता धोरण, विनोद क्षीरसागर, डॉ.आर.डी. गोफणे, आरोग्य अधिकारी डॉ. उमेश सावजी, डॉ. लवंगे, आर.बी. जाधव व माध्यम अधिकारी श्रीमती पांडे, आरोग्य सहाय्यिका खडसे, श्रीमती जेवूघाले, आर.पी. लोखंडे तसेच मोठय़ा संख्येत उमाळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व आरोग्य कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. याशिवाय ग्रामीण भागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

Web Title: The second session of the Pulse Polio Vaccination Campaign launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.