कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन कोटींवर खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:24 AM2021-06-25T04:24:58+5:302021-06-25T04:24:58+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा प्रशासनाला उपाययोजना करताना चांगलीच कसरत करावी लागली. कोविड सेंटरमधील कोरोना योद्ध्यांना १६ ...

The second wave of Corona cost over two crores | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन कोटींवर खर्च

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन कोटींवर खर्च

Next

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा प्रशासनाला उपाययोजना करताना चांगलीच कसरत करावी लागली. कोविड सेंटरमधील कोरोना योद्ध्यांना १६ हजार ४१० पीपीई कीटचे संरक्षण कवच देण्यात आले. पीपीई कीटसह बॉडी कवर, रॅपिड ॲन्टिजन कीट व इतर साहित्याच्या खरेदीसाठी जवळपास २ कोटी २१ लाख ३ हजार ७७५ रुपये खर्च करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न, नागरिकांचा प्रतिसाद आणि योग्य नियोजनाने जिल्ह्यात आता कोरोनाची लाट नियंत्रणात आली आहे. परंतु या लाटेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबरोबरच मृत्यूचा आकडाही या लाटेत वेगाने वाढला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६ हजार ४४१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, ६५६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेचा अनुभव आल्यानंतर दुसऱ्या लाटेत मात्र जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाययोजनांकडे लक्ष दिले. दुसऱ्या लाटेत औषधी व इतर साहित्य सामग्रीचा खर्च कोट्यवधी रुपये झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये पीपीई कीट, बॉडी कवर, रॅपिड ॲन्टिजन कीट, व्हीटीएम कीट, औषधी, रेमडेसिविर इंजेक्शन आदींच्या पुरवठ्यासाठी हा खर्च करण्यात आला आहे.

आरोग्य विभाग झाला अलर्ट

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, प्रशासनाने तयारीत राहण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे. त्यानुषंगाने अनेक ठिकाणी कोविड समर्पित हॉस्पिटलही उभारण्यात येत आहे.

एका पीपीई कीटसाठी ३०० रुपये खर्च

कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट महत्त्वाचे संरक्षण आहे. जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये एकूण ७३८ कोविड कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १६ हजार ४१० पीपीई कीट खरेदी करण्यात आल्या होत्या. एका पीपीई कीटसाठी साधारणत: ३०० रुपये खर्च येतो. त्यानुसार ४९ लाख २३ हजार रुपये पीपीई कीटवर खर्च करण्यात आले आहेत.

दुसऱ्या लाटेत लागलेले साहित्य व खर्च

व्हीटीएम कीट १८८०३० १२२२१९५०

रॅपिड ॲन्टिजन कीट १३८३५०

पीपीई कीट १६४१० ४९२३०००

एनॉक्सॅपरिन २३०७७ ४५०००१५

बॉडी कवर ९४६ ४५८८१०

Web Title: The second wave of Corona cost over two crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.