राज्य कृषी सचिवांनी घेतला वेअर हाऊसचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:24+5:302021-06-26T04:24:24+5:30

हरभरा आदींची पाहणी केली. तेथील येणाऱ्या मालाची आवक-जावक कशा पद्धतीने केली जाते व मजूर कशा पद्धतीने काम करतात याचे ...

The Secretary of State for Agriculture reviewed the ware house | राज्य कृषी सचिवांनी घेतला वेअर हाऊसचा आढावा

राज्य कृषी सचिवांनी घेतला वेअर हाऊसचा आढावा

Next

हरभरा आदींची पाहणी केली. तेथील येणाऱ्या मालाची आवक-जावक कशा पद्धतीने केली जाते व मजूर कशा पद्धतीने काम करतात याचे प्रत्यक्ष अवलोकन केले. कोल्ड स्टोअरेजच्या उपलब्ध असलेल्या मालावर कुठल्याही प्रकारचे फेब्रिकेशन व फवारणी न करता मालाची प्रत उत्कृष्ट असल्याबद्दल त्यांनी बुलडाणा अर्बनचे विशेष कौतुक केले. यावेळी बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर यांनी बुलडाणा अर्बनच्या वेअर हाऊसच्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली. चिखली येथील कोल्ड स्टोअरेजप्रमाणे मलकापूर येथे सुद्धा कोल्ड स्टोअरेज शेतकऱ्यांसाठी एक वर्षापासून उपलब्ध करुन दिले आहे. नियोजित कोल्ड स्टोअरेजची शृंखला येत्या एका वर्षात तीन ते चार कोल्ड स्टोअरेज शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन यावेळी डॉ.सुकेश झंवर यांनी दिले. महाराष्ट्र कृषी सचिव एकनाथ डवले यांचे डॉ.सुकेश झंवर यांनी वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर भालेराव यांनी केले. तर आभार संजय सोनवणे यांनी मानले.

Web Title: The Secretary of State for Agriculture reviewed the ware house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.