परिचारिकेसह सुरक्षा रक्षक बडतर्फ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:02 AM2017-09-29T01:02:36+5:302017-09-29T01:02:44+5:30
खामगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयातून एका बुरखाधारी महिलेने २७ सप्टेंबर रोजी पाच दिवसाचे बालक पळविल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, या प्रकरणात शहरातून जाणार्या प्रत्येक मार्गावरील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत असून, पोलिसांना धुळे येथील एका टोल नाक्यावर वाहनासंदर्भातील महत्त्वपूर्ण सुगावे हाती लागले आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेगाने चक्र फिरवित उशिरा रात्री आरोपींच्या शोधार्थ पाच पथके धुळे आणि बर्हाणपूरच्या दिशेने रवाना केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमय्या परवीन यांना प्रसूतीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात २३ सप्टेंबर रोजी भरती करण्यात आले. त्यांनी एका बालकाला जन्म दिला. आई आणि बाळाची प्रकृती चांगली असल्याने, दोघांनाही रुग्णालयातील वार्ड क्रमांक ५ मध्ये हलविण्यात आले. दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी रात्री ३.३0 वाजता एका बुरखाधारी महिलेने सुमय्या परवीन यांच्या पाच दिवसाच्या बालकाचे अपहरण केले. महिलेने बाळाचे अपहरण केल्यानंतर ही महिला रुग्णालयाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये बसून रवाना झाली. या कारमध्ये आधीच दोन पुरूष बसले असल्याची माहिती समोर आली आहे.
बुरख्यात महिला की पुरूष !
नवजात बालकाचे अपहरण करणारी एक महिला सीसी कॅमेर्यामध्ये दिसून येते. त्याचवेळी बुरखाधारी महिलेच्या एका हातात बालक असलेली बॅग आहे. तर दुसर्या हाताने ५-६ वर्षाच्या मुलीला सहजतेने उचलताना दिसून येते. त्यामुळे अ पहरण करणारी महिला की पुरूष, अशी शंका उपस्थित होत आहे.
बालक अपहरणप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याकामी पोलीस प्रशासनाला महत्त्वपूर्ण सुगावे हाती लागले आहेत. सीसी टीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. त्यामुळे पोलिसांना लवकरच आरोपींना पकडण्यात यश येईल, असा विश्वास आहे.
- यू. के. जाधव
पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, खामगाव.