परिचारिकेसह सुरक्षा रक्षक बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 02:23 AM2017-09-29T02:23:59+5:302017-09-29T02:24:21+5:30
खामगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पाच दिवसाचे बालक पळविल्याच्या घटने प्रकरणी कर्तव्यावर हजर असलेल्या परिचारिका लीलावती खरे आणि सुरक्षा रक्षक पुरुषोत्तम काळे यांना उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी बडतर्फ केल्याची माहिती सामान्य रुग्णालयाचे प्रभारी सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. टापरे यांनी दिली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथक गठित केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

या प्रकरणात शहरातून जाणार्या प्रत्येक मार्गावरील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत असून, धुळे येथील एका टोल नाक्यावर वाहनासंदर्भातील महत्त्वपूर्ण सुगावे हाती लागले आहेत. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमैय्या परवीन यांना प्रसूतीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात २३ सप्टेंबर रोजी भरती करण्यात आले. त्यांनी एका बालकाला जन्म दिला. आई आणि बाळाची प्रकृती चांगली असल्याने, दोघांनाही रुग्णालयातील वार्ड क्रमांक ५ मध्ये हलविण्यात आले. दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी रात्री ३.३0 वाजता एका बुरखाधारी महिलनेने सुमैय्या परवीन यांच्या पाच दिवसांच्या बालकाचे अपहरण केले. महिलेने बाळाचे अपहरण केल्यानंतर ही महिला रुग्णालयाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये बसून रवाना झाली. या कारमध्ये आधीच दोन पुरुष बसले असल्याची माहिती समोर आली आहे.