महाबीज राबवणार बीजाेत्पादन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:23 AM2021-07-04T04:23:55+5:302021-07-04T04:23:55+5:30

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. अकोलांतर्गत जिल्हा जिल्ह्यात बीजाेत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क ...

Seed production program to be implemented by Mahabeej | महाबीज राबवणार बीजाेत्पादन कार्यक्रम

महाबीज राबवणार बीजाेत्पादन कार्यक्रम

Next

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. अकोलांतर्गत जिल्हा जिल्ह्यात बीजाेत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन महाबीजच्या वतीने करण्यात आले आहे.

बुलडाणा कार्यालयासाठी खरीप २०२१-२२ हंगामात सुधारित कापूस, तूर, उडीद पिकांच्या वेगवेगळ्या वाणाचे बीजाेत्पादन कार्यक्रम उपलब्ध आहे. तसेच बीजाेत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी संबंधित सहायक क्षेत्र अधिकारी यांच्याकडे विविध कागदपत्रांसाठी अर्ज करावा लागणार आहे. प्रथम येणाऱ्या बीजाेत्पादकास प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच बियाणे उपलब्धतेनुसार सुरू राहणार आहे.

खरीप हंगामातील उडीद बियाण्याचे खरेदी धारणे हे १ ऑक्टाेबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत मेहकर, खामगाव आणि चिखली बाजार समितीचे जास्तीत जास्त दारची सरासरी अधिक २० ते २५ टक्के वाट धरून पास बियाणावर अंतिम शाेधन करण्यात येणार आहे. तूर पिकासाठी याच कालावधीत जास्तीत दर अधिक २० ते २५ टक्के वाढ धरून बियाणे पास केली जाणार आहे. या हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील सहायक क्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. माराेळे यांनी केले आहे.

Web Title: Seed production program to be implemented by Mahabeej

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.