आठ हजार शेतकऱ्यांनाच अनुदानित बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:13+5:302021-06-29T04:23:13+5:30
जिल्ह्यातील दिव्यांगांना मिळाला दिलासा बुलडाणा : काेराेनामुळे जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी शिबिर बंद करण्यात आले हाेते. काेराेनाची लाट ओसरत ...
जिल्ह्यातील दिव्यांगांना मिळाला दिलासा
बुलडाणा : काेराेनामुळे जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी शिबिर बंद करण्यात आले हाेते. काेराेनाची लाट ओसरत असल्याने दिव्यांग तपासणी शिबिर ९ जूनपासून पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यामुळे दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.
खते-बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर द्या
बुलडाणा : हवामान विभागाने जून महिन्यातच पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या वर्षी लवकरच पेरणी सुरू हाेण्याची शक्यता असल्याने, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर खते उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.
तलाठ्याच्या गावभेटी कागदावरच
धामणगाव धाड : शेतकऱ्यांचा सातत्याने संपर्क येणाऱ्या तलाठ्यांना साज्यावर कामकाज करण्याचा नियम आहे, परंतु तालुक्यातील बहुतांश तलाठी गावभेटीचे वेळापत्रक पाळीत नसल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे
७२ प्रकरणांमध्ये घडवला समझाेता
बुलडाणा : लॉकडाऊन काळात संपूर्ण कुटुंबच घरामध्ये अडकल्याने दैनंदिन आयुष्याचे गणित बिघडले. जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते मे २०२१ पर्यंत २०७ तक्रारी दाखल झाल्या आहेत़ त्यापैकी ७२ प्रकरणांमध्ये भराेसा सेलने समझाेता घडवला आहे़
वाढत्या अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात
धोत्रा नंदई : वाकी बु. येथे गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छता निर्माण झाली आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाढत्या अस्वच्छतेने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात मुख्य रस्त्यात गटार साचल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
किसान सन्मान योजनेपासून वंचित
धामणगाव धाड : कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी सरकारने किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. काहींना लाभ मिळाला. मात्र, काही अद्यापही वंचित आहेत.
ग्रामीण भागातील रस्ते ठरताहेत धोकादायक!
धाड : ग्रामीण भागातील रस्त्यावरून रहदारी करणे आता जीवावरचा खेळ बनला आहे. या रस्त्याने साधे चालणेही अवघड झाले आहे. अनेक मार्गांवर खड्ड्यांची मोजदाद केल्यास कधी तरी हा मार्ग पूर्णतः डांबरीकरण झाला होता काय, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
अवैध धंदे वाढले, नागरिक त्रस्त
सिंदखेडराजा : शहरातील जिजामातानगर परिसरात वाढत्या अवैध धंद्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
फळबागेत आंतर पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल
मासरूळ : फळबागेत आंतर पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. येथील एका शेतकऱ्याने फळबागेत आंतर पीक म्हणून वाल हे पीक घेतले आहे. परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून राहावे लागते.
सायकल दुरुस्तीच्या कामांना सुरुवात
लोणार : अनलॉकनंतर दुकाने सुरू झाल्याने लहान मुलांच्या सायकल दुरुस्तीची कामे कारागिरांकडे येऊ लागली आहेत. सध्या शाळा बंद असल्याने तसेच लॉकडाऊनमुळे मुलांना बाहेर येता येत नव्हते. आता पालकांनी सायकली दुरुस्तीसाठी काढल्या आहेत.
गावी आलेले मजूर वळले शेतीकडे
सुलतानपूर : कोरोनामुळे गावी गेलेले मजूर आता शेतीकामांवर परतू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या कालावधीत अनेक मजूर गावी गेल्याने तर काही मजूर कामावर नसल्याने कामांचा खोळंबा झाला होता.
कोचिंग क्लासेसला परवानगीची प्रतीक्षा
बुलडाणा : राज्य शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे. कोचिंग क्लासेस बंद असल्याने कोचिंग क्लासेस चालक अडचणीत सापडले आहेत.