बुलडाणा जिल्ह्यात बियाणे विक्री अत्यल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 03:26 PM2019-06-03T15:26:43+5:302019-06-03T15:26:51+5:30

बुलडाणा: विदर्भात येत्या पंढरवाड्यात मान्सून धडकणार असल्याचे हवामान खात्याचे संकेत असतानाच खरीपाच्या पेरणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनमध्ये अपेक्षीत लगबग दिसत नसल्याचे चित्र आहे.

seeds sales not speed up yet in Buldhana | बुलडाणा जिल्ह्यात बियाणे विक्री अत्यल्प!

बुलडाणा जिल्ह्यात बियाणे विक्री अत्यल्प!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: विदर्भात येत्या पंढरवाड्यात मान्सून धडकणार असल्याचे हवामान खात्याचे संकेत असतानाच खरीपाच्या पेरणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनमध्ये अपेक्षीत लगबग दिसत नसल्याचे चित्र आहे. कृषी केंद्रावरही बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची अपेक्षीत गर्दी दिसून येत नाही. पीक कर्ज वाटपाचा टक्काही तुलनेने कमी असल्याने शेतकºयांच्या हातात पुरेसे पैसे नसल्याचे चित्र आहे. सध्यातरी मान्सूनचे चिन्ह नसल्याने गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १० ते १५ टक्क्यापर्यंत खत-बीयाण्याची विक्री झाल्याचे दिसून येत आहे.
यंदा शेतकरी धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे गतवर्षाशी तुलना करता वर्तमान काळात अवघी दहा ते १५ टक्क्यांच्या आसपास खत व बियाण्यांची विक्री झाली आहे. त्यातच जी काही विक्री होत आहे ती प्रामुख्याने तूर, उडीद, मुग आणि मका या बियाण्यांचीच होत आहे. बियाणे महामंडळाने अद्याप सोयाबीनच्या बियाण्यावर सबसीडी जाहीर केलेली नाही. त्यामुळे सोयाबीन बियाण्यांची खरेदी करण्याचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. लवकरच ती सबसीडी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष सोयाबीनचे बियाणे घेण्याकडे शेतकºयांचा कल राहील. सबसीडी मिळाल्यास वर्तमान स्थितीत १८५० रुपयापर्यंत जाणारी सोयाबीनची बॅग ही १४०० रुपयांच्या आसपास किंमतीची होईल. ज्वारीलाही वर्तमान स्थिती फारसी मागणी नाही. काही नवीन वाणही बाजारपेठेत दाखल होत असले तरी त्यावरही सबसीडी नाही. परिणामी एकंदरीत विचार करता बाजारपेठेत प्रती दुकान साधारणत: एक ते दीड लाख रुपयांच्या आसपास बियाणे व खतांची विक्री होत असल्याचे के. आर. लवकर आणि दत्ता उबाळे या कृषी केंद्र चालकांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात ११५० कृषी केंद्र असून त्यातील २०० कृषी केंद्रांची तपासणी झाली असून खरीपाचे साडेसात लाख हेक्टर क्षेत्र राहील.
ठिबकच्या कपाशीवर परिणाम
दुष्काळी स्थिती पाहता ठिबकवरील कपाशीवरही विपरीत परिणाम झालेला आहे. बुलडाणा जिल्ह्यात साधारणत: १८ हजार ६०२ हेक्टरवरील कपाशी ही ठिबकवर असते. मात्र यंदाची परिस्थिती विपरीत आहे. पाण्याची उपलब्धता नसल्याने कपाशीला अपेक्षीत मागणी नाही. सोबतच कपाशीचे लागवड क्षेत्रही घटण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: seeds sales not speed up yet in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.