एकाच बॅगेत निघाले दोन वाणांचे बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:39 AM2021-09-05T04:39:03+5:302021-09-05T04:39:03+5:30
तालुक्यातील नायगाव देशमुख येथील मैनाबाई बाबूसिंग राठोड यांच्या मालकीची गट नंबर ३४ मध्ये सात एकर जमीन आहे. या ...
तालुक्यातील नायगाव देशमुख येथील मैनाबाई बाबूसिंग राठोड यांच्या मालकीची गट नंबर ३४ मध्ये सात एकर जमीन आहे. या जमिनीच्या खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी महिलेने मेहकर येथून जे. एस. ३३५ कंपनीच्या सोयाबीन बियाच्या सात बॅग ११ जून रोजी खरेदी केल्या होत्या. बॅगमधील सोयाबीन बियाण्याची पेरणीदेखील शेतकऱ्याने शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या शेतामध्ये केली. सोयाबीन पिकाने सध्याच्या परिस्थितीमध्ये शेंगांची धारण झाली असल्याने अर्ध्या शेतामधील क्षेत्रात शेंगांमध्ये दाणे आहेत, तर उर्वरित क्षेत्रामध्ये अजून सोयाबीनच्या शेंगामध्ये दाण्याची धारणा व्हायची बाकी आहे. त्यामुळे सात एकरांतील अर्धेअधिक क्षेत्र सोगणींसाठी महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. उर्वरित क्षेत्रासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची तक्रार ३ सप्टेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
---
एकाच शेतातील अर्धे सोयाबीनच्या शेंगातील दाणे तयार झाले, तर उर्वरित क्षेत्रातील सोयाबीनला अजून शेंगाच आलेल्या नाहीत. त्यामुळे माझी बियाणे कंपनीकडून फसवणूक झाली आहे
-मैनाबाई राठोड, महिला शेतकरी,नायगाव देशमुख.