प्लास्टिक पिशव्या जप्तीसाठी खामगावात धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:12 PM2018-11-14T17:12:57+5:302018-11-14T17:13:33+5:30
खामगाव : प्लास्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी बुधवारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने खामगावात धाडी टाकण्यात आल्या.
खामगाव : प्लास्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी बुधवारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने खामगावात धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याने, बाजारपेठेत एकच खळबळ उडाली होती.
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही खामगावच्या बाजारपेठेत या पिशव्या सहज उपलब्ध होत असल्याची कुणकुण महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला लागली. प्लास्टिक बंदी विरोधातील पालिकेची कारवाई सैल होत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बुधवारी खामगावात धडकले. अकोला येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी जितेंद्र पुरते यांनी खामगाव नगर पालिकेचे अभियंता नीरज नाफडे, आरोग्य अधिकारी आणि कर्मचाºयांसोबत तीन विक्रेत्यांवर कारवाई केली. यावेळी जलालपुरा भागातील गोदामल लेखुमल, आठवडी बाजारातील शिव ट्रेडर्स आणि टिळक पुतळ्या शेजारील एका ठिकाणी धाड टाकून प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपरोक्त प्लास्टिक व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.