अनुराधा फार्मसीच्या मोहसीन शेखची "कॉग्निझंट"साठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:23 AM2021-06-20T04:23:36+5:302021-06-20T04:23:36+5:30

अनुराधा फार्मसी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासह शिक्षणापश्चात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी ''ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट'' विभाग कार्यरत आहे. या ...

Selection of Mohsin Sheikh of Anuradha Pharmacy for "Cognizant" | अनुराधा फार्मसीच्या मोहसीन शेखची "कॉग्निझंट"साठी निवड

अनुराधा फार्मसीच्या मोहसीन शेखची "कॉग्निझंट"साठी निवड

Next

अनुराधा फार्मसी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासह शिक्षणापश्चात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी ''ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट'' विभाग कार्यरत आहे. या विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मोहसीन शेख याची निवड झाली आहे. संस्थेचे सचिव तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयांत ट्रेनिंग प्लेसमेंटअंतर्गत विविध कंपन्यांच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन सातत्याने करण्यात येते. या विभागाचे मुख्य समन्वयक प्रा. यु. एम. जोशी यांच्या पुढाकारातून यावर्षी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी देश - विदेशातील फार्मसी क्षेत्रामध्ये उच्चपदस्थ माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ऑनलाईन वेबिनारच्या मदतीने विद्यार्थ्यांना उद्योगामध्ये भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून विविध कंपन्यांशी करार केला आहे. उच्चपदस्थ माजी विद्यार्थ्यांकडून फार्मसी उद्योगातील नोकरीच्या संधी मिळविण्यासाठी प्रोत्साहित करणे हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना योग्यवेळी योग्य संधी प्राप्त होत असून, आज देश-विदेशात अनेक विद्यार्थी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवित आहेत. ही गौरवाची बाब असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बियाणी यांनी व्यक्त केले आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष, कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे, सचिव राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ. व्ही. आर. यादव, विश्वस्त सिध्देश्वर वानेरे, सलिमोदीन काझी, अनंतराव सराफ, आत्माराम देशमाने, प्राचार्य डॉ. बियाणी, डॉ. काळे, डॉ. पागोरे, प्रा. जोशी, डॉ. उप्पला मोहन कुमार, प्रा. पवन फोलाने व प्राध्यापकवृृंदांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Selection of Mohsin Sheikh of Anuradha Pharmacy for "Cognizant"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.