प्रथमेश जावकारची भारतीय तिरंदाजी संघात निवड, बुलढाण्याचा मान वाढला!

By निलेश जोशी | Published: February 20, 2023 05:45 PM2023-02-20T17:45:04+5:302023-02-20T17:45:21+5:30

आगामी काळात चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी

Selection of Prathamesh Javakar in the Indian archery team, Buldhana's honor increased! | प्रथमेश जावकारची भारतीय तिरंदाजी संघात निवड, बुलढाण्याचा मान वाढला!

प्रथमेश जावकारची भारतीय तिरंदाजी संघात निवड, बुलढाण्याचा मान वाढला!

Next

नीलेश जोशी, बुलढाणा: हरियाणातील सोनीपत येथे राष्ट्रीय अकादमीमध्ये झालेल्या तिरंदाजी संघाच्या निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याने बुलढाण्याचा प्रथमेश जवकार याची भारती तिरंदाजी संघात निवड झाली आहे. दरम्यान, त्याची कामगिरी पाहता आगामी वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या चार क्रीडा स्पर्धेत खेळण्याची त्यास संधी आहे. गेल्या ६ वर्षांपूर्वी छत्तीगडमध्ये झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथमेश चमकला होता. त्यात त्याने दोन सुवर्ण व एका रजत पदकाची कमाई केली होती.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याला खेळण्याच्या काही संधी मिळाल्या होत्या. दरम्यान, १७ ते २० फेब्रुवारीदरम्यान हरियाणातील सोनीपत येथे तिरंदाजीच्या राष्ट्रीय संघाच्या निवड चाचणीत त्याने केलेली उत्कृष्ट कामगिरी पाहता त्याची भारतीय तिरंदाजी संघात निवड झाली आहे. परिणामी आगामी वर्षात होणाऱ्या वर्ल्ड कप, एशियन गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि एशियन चॅम्पियनशीपमध्ये त्याला यामुळे खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतासाठी पुन्हा दमदार कामगिरी करून पदक मिळविण्यासठी त्याचे प्रयत्न राहतील.

दुसरीकडे १ मार्चपासून हरियाणातील सोनीपत येथील साईच्या शिबिरामध्ये भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यात तो सहभागी होणार आहे. त्याला प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांचे मार्गदर्शन लाभले आहे. बुलढाणा आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश लहाने, सचिव मनोज व्यवहारे, शिवबा आर्चरी अकादमीचे अध्यक्ष ॲड. सुधाकर दळवी, महाराष्ट्र धनुर्विद्या संघाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, भारतीय तिरंदाजी संघाचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Web Title: Selection of Prathamesh Javakar in the Indian archery team, Buldhana's honor increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.