बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:44+5:302021-01-24T04:16:44+5:30

स्वयंसहाय्य बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनाची पाहणी केली. त्यामध्ये खाद्यपदार्थ पेढा, मठ्ठा, आवळा मुरबा, लोकरीच्या वस्तू, सजावटीच्या वस्तू, बचतगटांनी तयार ...

Self-help group women | बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन

बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन

googlenewsNext

स्वयंसहाय्य बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनाची पाहणी केली. त्यामध्ये खाद्यपदार्थ पेढा, मठ्ठा, आवळा मुरबा, लोकरीच्या वस्तू, सजावटीच्या वस्तू, बचतगटांनी तयार केलेला केक व बेबी कीट आदी वस्तूंची पाहणी केली. नंतर स्री जन्माचे स्वागत केले. यामध्ये स्तनदा मातेचा शाल व श्रीफळ व बचतगटाने तयार केलेली बेबी कीट देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ठाकरे यांनी गणेश गटास ४ लाख ४२ हजार रुपये व प्रज्ञा गट चार लाख २३ हजार रुपये असे एकूण आठ लाख ६५ हजार रुपये कर्ज वितरण केले. पाहणी झाल्यानंतर उद्योग करत असेलल्या महिलांना व्यासपीठावर बोलावून उद्योग कशाप्रकारे करता याची माहिती घेतली. त्यानंतर सीएमआरसीला मिळालेल्या कृषी अवजार बँोचे उद्घाटन केले. मानव विकास मिशन अंतर्गत मिळालेल्या भाजीपाला बीजोत्पादन युनिट परतपूर येथे भेट दिली. बिजोत्पादन युनिटमध्ये काम करत असलेल्या बचतगटामधील महिलांनी ठाकरे यांचे स्वागत केले. ठाकरे यांनी महिलांशी सवांद साधून उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी महिलांनी बैलगाडीमध्ये बसून शेतामध्ये प्रवास केला. सूत्रसंचालन केंद्राच्या व्यवस्थापक जया ढोरे यांनी केले. यावेळी अमरावती विभागाचे केशव पवार, जिल्हा समन्यव्यक अधिकारी सुमेध तायडे, कुंदन सदाशिव, सीएमआरसीच्या अध्यक्ष निर्मला देशमुख, सचिव शांता हिवाळे, मेहकर नगर परिषदचे उतपुरे, अमित वडगावकर यांच्यासह मविम जिल्हा कार्यालय सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Self-help group women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.