स्वखर्चाने बनविला रस्ता
By admin | Published: July 5, 2016 12:59 AM2016-07-05T00:59:52+5:302016-07-05T00:59:52+5:30
डोणगाव येथील नागरिकांनी पुढाकार घेऊन रस्ता तयार केला.
डोणगाव (जि. बुलडाणा): एकीकडे गतीमान शासन जनतेला सुखसुविधा पुरवित असताना दुसरीकडे स्वखर्चाने रस्ता तयार करणारी जनता डोणगावमध्ये पावसाळ्यात रस्त्याविना त्रस्त असल्याने वार्डातील लोकांनी एकत्र येऊन चक्क रस्ता तयार केला. डोणगाव येथे वार्ड क्र.२ मध्ये स्थानिक राज्य महामार्गालगत नविन वस्ती तयार झालेली असून, सदर वार्डातील लोकांना पावसाळ्यात जाण्यायेण्यासाठी त्रास व्हायचा. ग्रामपंचायतला वारंवार कळवूनही ग्रामपंचायतने दखल न घेतल्याने शेवटी वार्डातील लोक एकत्र आले व त्यांनी स्वखर्चाने रस्त्यावर मुरुम व पाईप टाकले यासाठी वार्डातील संजय बोडखे, प्रदीप पांडव, डॉ.गणेश सौभागे, शिवाजी काळे, विक्रांत तुपाडे, कर्हाळे, शिंगणे, डॉ.बाजड, डाखोरे या ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात केली व ३५ हजार रुपये लोकवर्गणी जमा झाली. त्यातूनच या ग्रामस्थांनी पावसाळ्यात जाण्यायेण्यासाठी स्वखर्चाने रस्ता बनविला आहे. आजही वार्ड क्र.२ मध्ये पोलिस स्टेशनच्या मागे राहणार्या लोकांना रस् ता नसल्याने त्यांना पावसाळ्यात चिखलातून जावे लागत आहे. याकडे प्रशासनाने व ग्राम पंचायतने लक्ष द्यावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी संबंधितांकडे निवेदनाद्वारे केली आहे.