अनुराधा फार्मसीत फार्मा उद्योगात विदेशातील संधी विषयावर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:34 AM2021-04-10T04:34:25+5:302021-04-10T04:34:25+5:30
चिखली : स्थानिक अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, फार्मा उद्योगांतर्गत विदेशामध्ये उपलब्ध असलेल्या संधी या ...
चिखली : स्थानिक अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, फार्मा उद्योगांतर्गत विदेशामध्ये उपलब्ध असलेल्या संधी या विषयावर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा असोसिएट डायरेक्टर, बानेर हेल्थ केअर, अमेरिका येथील डॉ़.हर्षल हरलालका यांचे ऑनलाइन पद्धतीने चर्चासत्र ८ एप्रिल रोजी पार पडले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर. बियाणी यांनी प्रास्ताविकात अनुराधा फार्मसी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विदेशात उच्चपदावर कार्यरत असल्याची माहिती देऊन पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, विदेशातील उच्च शिक्षणसाठी स्पर्धा परीक्षा, फार्मा उद्योगातील रोजगाराच्या संधी या विषयीची माहिती मिळावी, या उद्देशाने संस्थेचे सचिव राहुल बोंद्रे यांच्या कल्पनेतून सदर वेबिनारचे आयोजन केले आल्याचे सांगीतले, तर डॉ.हर्षल हरलालका यांनी भारतातील फार्मसी पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, विदेशामध्ये फार्मसी क्षेत्रातील डी.फार्म, एम.एस.फार्मसी पदव्युत्तर पदवी या सारख्या अभ्यासक्रमास प्रवेशासाठीच्या स्पर्धा परीक्षा, त्यांची तयारी, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर फार्म डी, पीच.डी, एम.एस.फार्मसी यांसारख्या अभ्यासक्रमास निवड झाल्यानंतर, अमेरिकन विद्यापीठामध्ये शिक्षण आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या चर्चासत्राला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बियाणी, प्राचार्य डॉ.आर.एच. काळे, प्राचार्य डॉ.आर.आर. पागोरे, डॉ.उप्पला मोहन कुमार, प्रा.पवन फोलाने, प्रा.एस.एस. कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने याचा लाभ घेतला. आभार ट्रेनिंग प्लेसमेंटचे समन्वयक प्रा.यु.एम. जोशी यांनी मानले.