पैसे देऊन लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिक पुढेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 11:51 AM2021-03-10T11:51:49+5:302021-03-10T11:52:00+5:30
coronaVaccine ३ मार्चपासून हे लसीकरण सुरू करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिक लस घेण्यात पुढेच आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : काेराेना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात दुर्धर आजारी व ६० वर्षांपेक्षा जास्त असलेल्या ज्येष्ठांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ३ मार्चपासून हे लसीकरण सुरू करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिक लस घेण्यात पुढेच आहेत.
केंद्र सरकारने काेविशिल्ड लसीला मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या टप्यात आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली. १ मार्चपासून जिल्हाभरात ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना काेराेना लस देण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन नाेंदणी करावी लागते. ग्रामीण रुग्णालये, प्राथिमक आराेग्य केंद्रामध्ये ही लस माेफत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपयांप्रमाणे ही लस देण्यात येत आहे. पैसे माेजूनही ज्येष्ठ नागिरकांचा काेराेना लस घेण्याकडे कल वाढला आहे. आतापर्यंत २ हजार ३३३ जणांनी खासगी रुग्णालयांमध्ये लस घेतली. कांची संख्या सर्वाधिक
जिल्हाभरात विविध केंद्रावर काेराेना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आता सरकारी केंद्रावर २६ हजार ३१३ जणांनी काेराेनाची लस घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या ही ६० वर्षावरील लाेकांची आहे. त्यामुळे, इतर वयाेगटातील लाेकांपेक्षा लस घेणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या माेठी आहे. जिल्ह्यातील जवळपास ५ हजार ज्येष्ठांनी आतापयर्यंत लस घेतली आहे. तसेच पैसे देउनही २ हजार ३३३ जणांनी लस घेतली आहे.
काेराेना संसर्गाचा वाढता धाेका पाहता सर्वांनी लस घेण्याची गरज आहे. लस घेउन स्वत:ला सुरक्षीत करा आणि इतरांनाही सुरक्षीत ठेवा. लस घेतल्यानंतर मला कुठलाही त्रास हाेत नाही. त्यामुळे,ही लस पूर्णता सुरक्षीत असल्याने सर्वांनीच लस घ्यावी.
प्रा.डाॅ.श्रीराम येरणकर, बुलडाणा
काेराेनाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी काेराेना लस घेण्याची गरज आहे. या लसीपासुन मला कुठलाही त्रास झाला नाही. ज्येष्ठ नागरिकांना काेराेनाचा धाेका पाहता सर्वांनीच लस घेण्याची गरज आहे.
वनिता नरहरी देशमुख,
बुलडाणा