मूकबधीर, गतिमंद युवतीवर अत्याचार प्रकरणी नराधमास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 05:10 PM2019-06-26T17:10:05+5:302019-06-26T17:10:12+5:30
मूकबधीर, गतिमंद युवतीवर अत्याचार प्रकरणी नराधमास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
Next
ल ोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मूकबधीर आणि गतीमंद असलेल्या मुलीला पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एका ७० वर्षीय नराधमास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. टी.सूर्यवंशी (खामगाव )यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. खामगाव तालुक्यातील पारखेड येथे २८ मार्च २०१६ रोजी एका गतीमंद आणि मूकबधीर मुलीचे रात्री अपहरण करण्यात आले. गावातीलच दिनकर त्र्यंबक भुटे (७०) या इसमाने गतीमंद मुलीला झोपडीत उचलून नेले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, तिच्यावर अत्याचार केला. ही बाब पिडीतेच्या वडिलांना समजताच, त्यांनी खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत पिडीतेचे वडील आणि ग्रामस्थांनी आरोपीस पकडून ठेवले. पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केल्यानंतर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे भादंवि कलम ३६३, ३६६, ३७६(२) अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने १० साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. पिडीतेसह वैद्यकीय अधिकारी अश्विनी जायभाये आणि तपास अधिकारी संजय निकुंभ यांचीही साक्ष याप्रकरणी महत्वाची ठरली. अॅड. रजनी बावस्कार(भालेराव) यांनी युक्तीवाद करताना आरोपीच्या जन्मठेपेची मागणी केली. मात्र, आरोपीच्या वयाचा विचार करता, न्यायालयाने कलम ३६३ मध्ये ३ वर्ष सक्तमजुरी दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तिन महिन्यांची शिक्षा, कलम ३६६ मध्ये ५ वर्ष सक्तमजुरी, दोन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा आणि कलम ३७६ (२) १०वर्ष शिक्षा, चार हजार रूपये दंड , दंड न भरल्यास ९ महिन्यांची शिक्षा सुनावली. आरोपीस सर्व शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले. घटनेपासून आरोपी कारागृहात अटक आहे.(प्रतिनिधी) पिडीतेची साक्ष घेण्यासाठी शिक्षकांची मदत!अत्याचार प्रकरणातील पिडीता ही मूकबधीर आणि गतीमंद आहे. त्यामुळे या पिडीतेची न्यायालयात साक्ष घेताना खामगाव येथील मूकबधीर विद्यालयातील शिक्षकांचे सहकार्य घेण्यात आले. मूकबधीर विद्यालयातील शिक्षकांच्या सहकार्याने पिडीतेने दिलेली साक्ष आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचविण्यास मोलाची ठरली. पिडीतेच्या अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव!अत्याचारग्रस्त पिडीता ही मूकबधीर आणि गतीमंद आहे. त्यामुळे सदर पिडीतेला अर्थसहाय्य मिळावे म्हणून जिल्हा विधी सेवा समितीने न्यायालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे समजते.