अपक्ष उमेदवारांमुळे सप्तरंगी लढत!
By admin | Published: October 6, 2014 11:53 PM2014-10-06T23:53:05+5:302014-10-06T23:53:05+5:30
युती, आघाडीच्या घटस्फोटानंतर जळगाव जामोद मतदारसंघातील लढत सप्तकोनी.
नानासाहेब कांडलकर /जळगाव जामोद (बुलडाणा)
जळगाव जामोद मतदारसंघातून सन १९५२, १९६२ व १९७२ अशा तीन वेळा शेकापचे भाई के.आर. पाटील हे विजयी झाले होते. तर सन १९९0, १९९५ व १९९९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करून कृष्णराव इंगळे यांनी हॅट्ट्रीक करण्याचा पहिला विक्रम नोंदविला होता. आता या विक्रमाची बरोबरी करण्याचा प्रयत्न भाजपाचे डॉ.संजय कुटे हे करीत आहे. सन २00४ व २00९ मध्ये सलग दोन वेळा विजय प्राप्त केल्यानंतर भाजपाकडून डॉ.संजय कुटे हे तिसर्यांदा रिंगणात उतरले आहेत. जर ते विजयी झाले तर एकाच पक्षाकडून सलग तीन वेळा विजय मिळविणारे ते एकमेव ठरतील. कारण कृष्णराव इंगळे यांची हॅट्ट्रीक ही दोन पक्षांची होती. प्रथम सेना व नंतर काँग्रेसकडून ते विजयी झाले होते.
मागच्या निवडणुकीत दुसर्या क्रमांकावर राहिलेले भारिप-बमसंचे प्रसेनजित पाटील यांनी यावेळी प्र थम क्रमांकावर येण्यासाठीचे नियोजन केले आहे. मागील निवडणुकीत मिळालेली मते कायम ठेवत, त्यामध्ये नवीन मतदारांना जोडण्याचे त्यांचे पध्दतशीर प्रयत्न सुरू आहेत. तर मागच्या वेळी शेगाव शहर सोडून इतर मतदारांसाठी नवखे असणारे काँग्रेसचे उमेदवार रामविजय बुरूंगले यांनी तिसरे स् थान पटकाविले होते. गत पाच वर्षात आपला संपर्क कायम ठेवत त्यांनी वेगळी ओळख निर्माण केल्याने ते तिसर्या क्रमांकावरून आता पहिल्या स्थानावर येण्यासाठी धडपड करित आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आ.स्व.तुळशिरामजी ढोकणे यांचा मुलगा प्रकाशसेठ ढोकणे हे प्रथमच विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. तर शिवसेनेचे संतोष घाटोळ व मनसेचे गजानन वाघ हे सुध्दा प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवित आहे. गजानन वाघ यांची शिवसेनेच्या माध्यमातून या म तदार संघात चांगली ओळख आहे. परंतु त्यांनी मध्यंतरी पक्षांतर करून आता रेल्वे इंजिन चालविण्यासाठी घेतले आहे. तुलनेत मनसेचे या मतदार संघात नेटवर्क कमी आहे. सेनेचे उमेदवार संतोष घाटोळ यांनाही मतदारांना ओळख करून द्यावी लागत आहे. या संपर्काचे रूपांतर मतकोटा वाढविण्यास कसे करता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे.