विभक्त केलेल्या राशनकार्ड धारकांनाही मोफत धान्य देण्यात यावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:46+5:302021-05-21T04:36:46+5:30
शासनाने लॉकडाऊन घोषित करून कडक निर्बंध घातले आहेत. हातावर पोट असणाऱ्या कामगारांना काम नाही, पैसा नाही आणि शिधापत्रिकेवर पैसे ...
शासनाने लॉकडाऊन घोषित करून कडक निर्बंध घातले आहेत. हातावर पोट असणाऱ्या कामगारांना काम नाही, पैसा नाही आणि शिधापत्रिकेवर पैसे देऊनही धान्य मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेक कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य शासन सगळ्याच श्रेणीतील रेशन कार्डधारकांना मोफत धान्य देत आहे; मात्र, विभक्त रेशनकार्ड धारकांशी दुजाभाव करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने शासनाशी पत्रव्यवहार करून गरीब व गरजू लोकांनासुध्दा मोफत धान्य मिळावे व त्यांच्या शिधापत्रिकेवर शिधा वाटप सुरळीत सुरु करावा, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये श्रीमंत, व्यावसायिक, गरीब सगळेच त्रस्त आहेत, असे असताना विभक्त शिधापत्रिकाधारकांवर अन्याय होत असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली असल्याने त्यांना तातडीने न्याय देण्यात यावा, अशी मागणी शेख मुख्तार यांनी केली आहे.