साखरखेर्डात काेव्हिड सेंटरएवजी विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:33 AM2021-05-15T04:33:45+5:302021-05-15T04:33:45+5:30
साखरखेर्डा आणि परिसरातील खेड्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने काही रुग्णांवर उपचार केले तर त्यांना बुलडाणा येथे हलविण्याची ...
साखरखेर्डा आणि परिसरातील खेड्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने काही रुग्णांवर उपचार केले तर त्यांना बुलडाणा येथे हलविण्याची गरज भासणार नाही . त्या अनुषंगाने साखरखेर्डा येथील सहकार विद्या मंदिरात कोव्हिड सेंटर सुरु करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव यांनी केली होती. परंतू साखरखेर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने आणि कोव्हिड सेंटर चालविण्यासाठी लागणारा अधिकारी व कर्मचारी वर्ग नसल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून कोरोना संसर्गजन्य आजार असलेल्या प्राथमिक स्तरावरील रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्यात येत आहे. यासाठी १३ मे रोजी तहसीलदार सुनील सावंत 'उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . महेंद्र साळवे , गटविकास अधिकारी देव गुणवंत ,' ठाणेदार जितेंद्र आडोळे 'सर्व तलाठी 'यांनी साखरखेर्डा येथील सहकार विद्या मंदिरात कोव्हिड सेंटर सुरु करण्यासाठी प्राथमिक तयारी केली आहे . या विलगीकरण कक्षात एक महसूल , ग्राम पंचायत कर्मचारी आणि पोलीस स्टेशन कर्मचारी उपस्थित राहणार असून प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी औषधोपचार करणार आहेत . या विलगीकरण कक्षासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे़