सवणा येथे लोकसहभागातून उभारले विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:20+5:302021-05-23T04:34:20+5:30

सवणा येथे लोकसहभागातून सुरू झालेल्या आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन आमदार श्वेता महाले, जि. प. सदस्य शरदनाना हाडे, प. स. ...

Separation room set up at Savana through public participation | सवणा येथे लोकसहभागातून उभारले विलगीकरण कक्ष

सवणा येथे लोकसहभागातून उभारले विलगीकरण कक्ष

Next

सवणा येथे लोकसहभागातून सुरू झालेल्या आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन आमदार श्वेता महाले, जि. प. सदस्य शरदनाना हाडे, प. स. सभापती सिंधू तायडे, प. स. सदस्य पती नासिर सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले.

आयसोलेशन सेंटर उभारण्याकरिता जि. प. सदस्य शरद हाडे, प. स. सदस्य नासिर सौदागर व सवणा सरपंचा, उपसरपंच व सर्वच सदस्य तसेच डॉ. खरात, डॉ. मिसाळ, डॉ. बेग, विजय ठेंग, आरिफ, सचिन थिगळे यांनी व गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून २० खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. या कार्यक्रमासाठी आरोग्य विभागाच्या डॉ. प्रज्ञा पाटील व त्याचे सर्वच सहकारी, बिडिओ सुमित जाधव, सहायक बिडिओ भारत हिवाळे, जि. प. शाळेचे सर्वच शिक्षक-शिक्षिका, तलाठी कासारे, सरपंच, उपसरपंच, सर्वच सदस्य ग्रा. प. कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडीसेविका मदतनीस पत्रकार विजय भुतेकर उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी बी. एस. डोंगरदिवे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विलगीकरण कक्षासाठी प्रयत्न केले.

Web Title: Separation room set up at Savana through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.