ग्राहकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा! -  जिल्हाधिकारी

By admin | Published: May 15, 2017 02:09 PM2017-05-15T14:09:51+5:302017-05-15T14:09:51+5:30

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,करमणूक कर विभाग, भारत संचार निगम लिमीटेड यांनी ग्राहकांच्या तक्रारींनाप्राधान्य देवून त्या निकाली काढाव्यात

Settle down grievances of customer complaints quickly! - Collector | ग्राहकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा! -  जिल्हाधिकारी

ग्राहकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा! -  जिल्हाधिकारी

Next

बुलडाणा - ग्राहक संरक्षण परीषदेच्या माध्यमातून येणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारी व अडचणी तातडीने सोडवायला हव्या. आलेल्या तक्रारींचे निरसन करून त्यांचे समाधान केले पाहिजे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, करमणूक कर विभाग, भारत संचार निगम लिमीटेड यांनी ग्राहकांच्या तक्रारींना प्राधान्य देवून त्या निकाली काढाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु काळे, अशासकीय सदस्य विजय डागा, अमरचंद संचेती, जोशी, कृषी उपसंचालक मनोजकुमार ढगे, बीएसएनएलचे राजोरीया आदी उपस्थित होते. सेट टॉप बॉक्स व केबल जोडणीच्या माहवार पावती देण्यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, केबल चालकांनी सेट टॉप बॉक्स खरेदीची पावती संबंधित ग्राहकाला द्यावी. तसेच माहवार केबल जोडणीच्या वसूलीची पावतीही द्यावी. हा ग्राहकांचा अधिकार आहे. आॅफलाईन शक्य नसेल, तर डिजीटल स्वरूपात द्यावी. याबाबत करमणूक कर विभागाने सर्व केबल आॅपरेटसंर्ना पत्र पाठवून पावती देण्याविषयी सक्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.   यावेळी अशासकीय सदस्यांनी विविध तक्रारी मांडल्या. त्यांचे निरसन केल्या गेले. बैठकीचे आभार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मानले. याप्रसंगी  पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संबंधित यंत्रणांचे अधिकारी, अशासकीय सदस्य आदी उपस्थित होते.

Web Title: Settle down grievances of customer complaints quickly! - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.