लोणार येथील उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 03:42 PM2018-05-02T15:42:06+5:302018-05-02T15:42:06+5:30
पंचायत समिती कार्यालयासमोर बसलेल्या दोन्ही उपोषण कर्त्यांशी १ मे रोजी आ.डॉ.संजय रायमुलकर व नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी चर्चा करून उपोषण सोडविले.
लोणार : जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवराच्या पूर्वेकडील बेघर अतिक्रमण धारकांना घरकुलाचा लाभ द्यावा, यासाठी तहसिल कार्यालयासमोर बसलेल्या व तालुक्यातील नांद्रा येथील रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर बसलेल्या दोन्ही उपोषण कर्त्यांशी १ मे रोजी आ.डॉ.संजय रायमुलकर व नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी चर्चा करून उपोषण सोडविले.
लोणार सरोवराच्या पूर्वेकडील काठावरील वसलेल्या अनधिकृत / अतिक्रमित घरे नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनात १६ एप्रिल रोजी जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये बेघर झालेल्या अतिक्रमण धारकांना घरे देण्यात यावी, या मागणीसाठी ३० एप्रिल रोजी रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष महेंद्र पनाड, प्रविण अवसरमोल, शेख मुस्तफा शेख नाज अहेमद हे तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. तसेच तालुक्यातील नांद्रा गावातील रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढून रस्ता व पाईप लाईन खुली करून देण्यात यावी, या मागणी करिता लोणार पंचायत समिती समोर नांद्रा येथील सुमित्रा मोरे, कौशल्य वाढवे, कांताबाई घुगे, राधाबाई वाणी, लक्ष्मीबाई सांगळे, वैशाली मोरे, वंदना डोळे, छाया डोईफोडे उपोषणास बसले होते. या दोन्ही उपोषण कर्त्यांशी १ मे रोजी आ.डॉ.संजय रायमुलकर व नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी चर्चा करून उपोषण सोडविले. यावेळी शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष नंदकिशोर मापारी, पं.स.सभापती निर्मलाताई जाधव, अजय हाडोळे, सुभाष मोरे उपस्थित होते.