दुचाकी चोरणाऱ्या टोळीकडून दोन देशी कटट्यांसह सात काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 05:28 PM2021-02-22T17:28:16+5:302021-02-22T17:28:28+5:30
Crime News या चाेरट्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील ११ गुन्हे व पुणे जिल्ह्यातील चोरीचे एकुण ६ गुन्हे असे एकुण १७ गुन्हे उघडकिस आले आहेत.
बुलडाणा : दुचाकी लंपास करणारी टाेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड करून त्यांच्याकडून दाेन देशी कट्यासह सात जीवंत काडतूस जप्त केले. पाेलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या टाेळीला अटक करून पाेलिसांनी १७ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकाने गस्तीवर असताना सोमनाथ बाबुराव सावळे रा. डोंगरशेवली ता.जि. बुलडाणा ह.मु. मांजरी खुर्द ता. हवेली जि. पुणे यास वरवंड फाटा येथे अटक केली हाेती. त्याची तपासणी केली असता त्याचेकडे दाेन देशी कट्टे, ७ जिवंत काडतुस, एक स्कुटी व एक मोबाईल फोन असा दाेन लाख ४५ हजार रुपयांचा एवज जप्त केला हाेता. त्याची पाेलिसांनी कसून चाैकशी केली असता गोपाल कोंडु चव्हाण रा. डोंगरखंडाळा ता.जि. बुलडाणा , मयुर अनिल राठोड, शैलेश सुरेश जाधव तिन्ही रा. डोंगरखंडाळा व मंगेश
बबन जेऊघाले वय रा. वरवंड यांची नावे समाेर आली. पाेलिसांनी पाचही जणांना अटक केली. त्यांनी बुलडाणा व पुणे जिल्हयात मागील वर्षभरापासुन विविध कंपनीच्या बऱ्यास दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली.या दुचाकी मनिष बाबुराव जाधव रा. बुलडाणा , संदीप नामदेव गावंडे रा डोंगरखंडाळा, स्वप्निल राजेंद्र गायकवाड रा. वरवंड , दत्तात्रय देवराव जेऊघाले रा. वरवंड , पांडुरंग लालसिंग जाधव रा. करवंड , कोंडु
गोबा चव्हाण रा. डोंगरखंडाळा यांच्याकडुन पाेलिसांनी जप्त केल्या. पाचही आराेपींकडून पाेलिसांनी दाेन देशी कट्टे, ७ जिवंत काडतुस, एक स्कुटी , मोबाईल फोन व १३ दुचाकी असा १५ लाख २० हजार रुपयांचा एवज जप्त केला आहे. या चाेरट्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील ११ गुन्हे व पुणे जिल्ह्यातील चोरीचे एकुण ६ गुन्हे असे एकुण १७ गुन्हे उघडकिस आले आहेत. ही कारवाइ पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया सा., अपर पोलीस अधौक्षक, खामगाव हेमराजसिंग राजपुत सा., अपर पोलीस अधीक्षक बुलडाणा बजरंग बनसोडे यांचे मार्गदर्शनात,
पो.नि. बळीराम गिते यांच्या आदेशान्वये पोउपनि निलेश शेळके, पाेलीस उपनिरीक्षक प्रदीप आढाव व पोलीस अंमलदार सुधाकर काळे, दिपक पवार, सुनिल खरात, गणेश शेळके, युवराज शिंदे व चालक राहुल बोडे यांनी केली.