१५ हजार शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदानाचे सात कोटी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 03:31 PM2019-07-14T15:31:25+5:302019-07-14T15:32:44+5:30

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील १५ हजार शेतकऱ्यांचे ७ कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान रखडले आहे.

 Seven crore rupees of drought subsidy pending | १५ हजार शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदानाचे सात कोटी रखडले

१५ हजार शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदानाचे सात कोटी रखडले

googlenewsNext

- अशोक इंगळे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील १५ हजार शेतकऱ्यांचे ७ कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान रखडले आहे. तालुक्यात ६४ हजार १३२ शेतकरी असून २०१८-१९ मधील दुष्काळासाठी तब्बल ३४ कोटी १८ लाख ९७ हजार १७० रुपयांची मदत मंजूर झाली होती. प्रत्यक्षात मात्र २७ कोटी २७ लाख ४२ हजार १७० रुपये प्राप्त झाले. उर्वरित ६ कोटी ९१ लाख ५५ हजार रुपये बाकी आहेत. बँक कर्ज देत नसून पेरणीला पैसे नसल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
तालुक्यात गतवर्षी ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिकाची आणेवारी ही ४५ पैसे आली होती. काही साझांमध्ये तर पिकाची पैसेवारी ही २५ पैशांपेक्षा कमी आली होती. या सर्व पिकांचा पटवारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांनी सर्व्हे करून शासनाला आकडेवारी सादर केली होती. त्यानुसार तालुक्यातील ६४ हजार १३२ शेतकऱ्यांना ३४ कोटी १८ लाख ९७ हजार १७० रुपये मिळणे गरजेचे होते. परंतू मार्चपूर्वी ज्या गावातील पटवाºयांनी दुष्काळबाधीत शेतकºयांची यादी सादर केली त्या ४३ हजार ७२ शेतकºयांना २७ कोटी २७ लाख ४२ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. ज्या शेतकºयांच्या बँक खात्यात दुष्काळी निधी जमा करण्यात आला नाही त्यांच्यात खळबळ उडाली.
सवडद येथील माजी सरपंच, बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनी उपोषणाचा इशारा दिला. मार्चपुर्वी तहसिल कार्यालयात दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या याद्या न देणाºया पटवारी आणि महसूल मंडळ अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पटवारी आणि मंडळ अधिकारी यांच्या कामचुकारपणामुळे शासन काय योजना राबविते हे शेतकºयांना कळत नाही. सवडद येथील पटवारी गेल्या एक वर्षापासून सुटीवर आहे. गुंज येथील पटवारी प्रशांत पोंधे यांच्याकडे सवडदचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांना वेळ मिळेल त्यावेळी ते सवडदला भेट देतात. त्यांचा कारभार चांगला असला तरी गावाची लोकसंख्या बघता त्यांची दमछाक होते. एकट्याच्या भरवशावर कामे रेंगाळली आहेत. गावाला स्वतंत्र पटवारी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title:  Seven crore rupees of drought subsidy pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.